Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी West Bengal Assembly Election 2021: तृणमूल कॉंग्रेसचा विजय विरोधकांना सूचक संदेश -...

West Bengal Assembly Election 2021: तृणमूल कॉंग्रेसचा विजय विरोधकांना सूचक संदेश – प्रशांत किशोर

Related Story

- Advertisement -

तृणमूल कॉंग्रेसचा विजय हा सर्वच विरोधी पक्षांसाठी एकप्रकारे संदेश आहे. सर्व राजकीय पक्षांनी ठरवल तर हे विरोधी पक्षही भाजपला चांगली स्पर्धा देऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिणारे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षांना सल्ला दिला आहे. त्याचवेळी प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसवरही भाष्य केले आहे. कॉंग्रेस पक्ष हा १०० वर्षे जुना असा पक्ष आहे. पण कॉंग्रेस पक्षाची स्वतःची अशी कार्यपद्धती आहे असेही ते म्हणाले. (West Bengal Assembly Election 2021 Result Analysis : Trinamool congress victory massage for opposition parties says political strategist Prashant Kishor)

कॉंग्रेस पक्ष जुना पक्ष असल्याने त्यांच्या कामकाजाची एक विशिष्ट पद्धत आहे. कॉंग्रेस सारखा पक्ष हा काम करण्यासाठी खुल्या पद्धतीने ते आव्हान घेत नाही. शिवाय प्रशांत किशोर किंवा पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट ज्या पद्धतीने काम करतात त्यासारख्या व्यक्तींना काम करण्यासाठी हा पक्ष ओपन नसतो. ज्या पद्धतीने प्रशांत किशोर यांची काम करण्याची पद्धत आहे, त्यानुसार काम करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष तयार नसतो. या पक्षाचा काही तरी प्रॉब्लेम आहे, या पक्षाने खरच काही तरी करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आणखी एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे भारतातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाची देशभरातील व्याप्ती आता कमी होत चालली आहे. कॉंग्रेसला केरळमध्येही पुनरागमन करण्यात अपयश आले आहे. एखादा दुसरा अपवाद वगळला तर कॉंग्रेस अशाच ठिकाणी सत्तेत आहे, ज्याठिकाणी हा पक्ष नेहमी जिंकून येतो. केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षांमध्ये सत्तांतर होते. मात्र त्याठिकाणी पिनराई विजयन यांच्या नेतृत्वातील डाव्या सरकारला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

बंगाल आणि तामिळनाडूतही कॉंग्रेसला विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही. बंगालमध्ये कॉंग्रेसने लेफ्ट फ्रंटसोबत लढण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी ९२ पैकी अवघी एक जागा निवडून आणण्यात कॉंग्रेसला यश आले. तामिळनाडूतही २५ जागांपैकी अवघ्या १६ जागांवर कॉंग्रेस आघाडीवर राहिली. कॉंग्रेसबद्दल बोलण्यासाठी मी छोटा माणूस आहे. कॉंग्रेसने स्वतःच पक्ष म्हणून आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेसची सध्याची मानसिकता अशी आहे की, पक्ष म्हणून कॉंग्रेसची भाजपसोबत लढत देण्याची ताकद नाही. माध्यमे सहकार्य करत नाहीत, कोर्टाकडून मदत मिळत नाही अशा प्रकारची मानसिकता कॉंग्रेससाठी काहीच उपयोग नसल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले.

- Advertisement -

राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला सर्व पद्धतीने लढतीची तयारी करावीच लागते. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष काम करतात, त्यानुसारच कॉंग्रेसनेही तयारी करायला हवी. तुम्ही लोकांशी जोडले जाऊ शकलात तर हीच सर्वात कळीची गोष्ट असल्याचेही ते म्हणाले. तृणमूल कॉंग्रेसचे विजयी कॅम्पेनचे मुख्य स्ट्रॅटेजिस्ट असलेल्या प्रशांत किशोर यांच्या स्ट्रॅटेजीनुसारच पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी विधानसभा निवडणूक लढवली. तर लोकसभा निवडणुकीतही ४२ पैकी १९ जागा जिंकण्यामध्ये टीएमसीला यश आले. गेल्या दहा वर्षांमध्ये २०१६ सारखााच विजय असल्याची सध्या चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवण्यात टीएमसीला यश आले आहे. तर भाजपला अवघ्या ८० जागांवर समाधान मानावे लागले आहे.


 

- Advertisement -