Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेता दिलीप कुमार रुग्णालयात दाखल,पत्नी सायरा बानोने दिली माहिती म्हणाली...

अभिनेता दिलीप कुमार रुग्णालयात दाखल,पत्नी सायरा बानोने दिली माहिती म्हणाली…

सध्या दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखी अंतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता  दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे. सध्या दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखी अंतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता दिलीप कुमार यांचं वय 98 वर्षे असून त्यांना रेग्युलर हेल्थ चेकअप करिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांची प्रकृती सध्या उत्तम असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिसचार्ज मिळणार असल्याचे त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी संगितले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण झाली होती. वेळेत उपचार केल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. कोरोनाची लागण झाल्यामुळे दिलीप कुमार यांनी आपला वाढदिवस देखील साजरा केला नाही. आणि याच दिवसाचे  अवचित्त साधून सायरा बानो यांनी गरजू लोकांना मदत केली होती.
अभिनेता दिलीप कुमार यांनी 1944 साली बॉम्बे टॉकीज निर्मित ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी 65 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1966 मध्ये त्यांनी अभिनेत्री सायरा बानोशी लग्न केले. तसेच 1981 मध्ये दिलीप कुमार यांनी दुसरे लग्न केलं होतं पण हा संसार जास्त काळ टिकू शकला नाही. सध्या दिलीप कुमार आणि पत्नी सायरा बानो वांद्रे येथे राहतात. दिलीप कुमार यांना एकही आपत्य नाही. “दिलीप कुमारः द सबस्टन्स अँड शेडो” या पुस्तकात त्यांनी खुलासा केला की सायरा बानूची गर्भधारणा झाली त्यावेळेस सायरा बानोला गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात उच्च रक्तदाबाचा त्रास वाढला आणि यामुळे डॉक्टर बाळाला वाचवू शकले नाही.


हे हि वाचा – भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड १९ विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

- Advertisement -