Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर केला सतत बलात्कार, लग्न ठरल्याचे समजताच आरोपीने सासरच्यांना...

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर केला सतत बलात्कार, लग्न ठरल्याचे समजताच आरोपीने सासरच्यांना पाठवला अश्लील व्हिडिओ

Related Story

- Advertisement -

एका तरुणीला नोकरीच आणि एका पक्षातील महिला मोर्चाचे अध्यक्ष बनवण्याचे अमिष दाखवून सतत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला एक किराणा दुकाने दिले आणि अश्लील चित्रफित करून तिला सतत धमकावून तिचे शोषण करत राहिला. एवढंच नाहीतर तरुणीचे लग्न ठरल्यानंतर ब्लू फिल्म तिच्या सासर मंडळींना पाठवली. ही घटना मध्यप्रदेशच्या रीवामध्ये घडली आहे. त्यामुळे सध्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

काही महिन्यांपूर्वी २० वर्षीय तरुणीचे लग्न ठरले होते. मुख्यमंत्री कन्यादान योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आरोपी मोहम्मद अकबरच्या तरुणी संपर्कात आली. त्यानंतर आरोपीने तरुणीला नोकरी देण्याचे आणि तिला महिला मोर्चाचे अध्यक्ष पद देण्याचे आमिष दाखवले. तिला एक किराणा दुकान घेऊन दिले. मग आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर आरोपी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत पीडित तरुणीवर बलात्कार करू लागला.

- Advertisement -

मग आरोपीने तरुणीने लग्न मोडण्यासाठी तिचे अश्लील व्हिडिओ तिच्या सासरच्या मंडळींना पाठवले आणि तिचे लग्न मोडले. शेवटी तरुणीने कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपी अकबरचा मोबाईल जप्त करून सायबर सेलद्वारे मोबाईलची तपासणी केली जात आहे.


हेही वाचा – स्वयंपाक तयार नसल्याने नवरा पिसाळला, बॅटच्या एका फटक्यात बायकोचा जीव घेतला


- Advertisement -

 

- Advertisement -