घरमनोरंजन'एका भूमिकेसाठी डान्सबारमध्ये घालवल्या अनेक रात्री', अदा शर्माचा खुलासा

‘एका भूमिकेसाठी डान्सबारमध्ये घालवल्या अनेक रात्री’, अदा शर्माचा खुलासा

Subscribe

‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. सिनेमात दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. सुनील ग्रोव्हरची वेब सिरीज ‘सनफ्लॉवर 2’ झी 5 वर 1 मार्च रोजी प्रदर्शित झाली. या वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री अदा शर्माही दाखल झाली आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री रोझी मेहता ही बार डान्सरची भूमिका साकारत आहे.

अदा शर्माला अनेक रात्री डान्सबारमध्ये काढाव्या लागल्या
दरम्यान आता अभिनेत्रीने ‘सनफ्लॉवर 2’ मधील तिच्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणते की तिने तिच्या भूमिकेसाठी डान्सबारमध्ये रात्र काढली. तिला पडद्यावर प्रभावी दिसायचे होते. अदा शर्मा म्हणाली, मला प्रभावी दिसायचे होते.फक्त नाचत असतानाच नाही, तर तुम्ही कसे बसता आणि उभे राहता आणि तुम्ही परफॉर्म करत नसताना तुम्ही तुमच्या शरीरासोबत किती आरामात आहात याविषयी आहे.

- Advertisement -

अभिनेत्री पुढे म्हणाली की, कधीकधी ती ध्यान करण्यासाठी पहाटे 5 वाजेपर्यंत डान्सबारमध्ये राहायची. अभिनेत्री पुढे म्हणाली, “ते इतके छान होते की त्यांनी मला बारमध्ये राहण्याची आणि गोष्टी पाहण्याची परवानगी दिली. बोलताना मी त्यांचा आत्मविश्वास पाहण्याचा प्रयत्न केला. मी रात्री 9 वाजता जायचे, कधी कधी पहाटे 4 ते 5 पर्यंत राहायचे.

दरम्यान, सध्या अदा तिच्या ‘बस्तर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तिने आयपीएस अधिकारी नीरजा माधवन ही भूमिका साकारली आहे. ‘द केरला स्टोरी’चे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -