घरताज्या घडामोडी'शेरशाह', 'राझी'नंतर आता करण जोहर उषा मेहतांवर बायोपिक करणार

‘शेरशाह’, ‘राझी’नंतर आता करण जोहर उषा मेहतांवर बायोपिक करणार

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर गेल्या पाच वर्षांत ‘राझी’, ‘केसरी’, ‘गुंजन सक्सेना’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘शेरशाह’ यासारखे देशभक्तीपर चित्रपट करत आहे. अलीकडेच करणने ‘सी. शंकरन नायर’ या बायोपिकची घोषणा केली, ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल सत्य उघड करण्यासाठी कायदेशीर लढाई लढली होती. आता काही वृत्तानुसार धर्मा प्रोडक्शन स्वातंत्र्यसैनिका उषा मेहता (Usha Mehta) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणार आहे.

भारत छोडो आंदोलना दरम्यान ब्रिटीश सरकारला उषा मेहतांनी ब्रिटिश सरकारला कठोर लढा दिला होता. स्वातंत्र्यानंतर त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्वातंत्र्यसैनिक उषा मेहतांचा जीवनपट साकारण्यासाठी करण जोहरची टीम बऱ्याच काळापासून पटकथेवर काम करत आहे. पटकथा अमात्या गोराडिया आणि प्रीतेश सोधा यांचे नाटक खार खारवर आधारित आहे.

- Advertisement -

माध्यमांच्या माहितीनुसार, उषा मेहता यांच्या जीवनपटासाठी मोठ्या अभिनेत्रीला कास्ट करण्याच्या तयारीत करण जोहर आहे. त्यामुळे सध्या कास्टिंग आणि प्री-प्रोडक्शनचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान या दिवसात करण जोहर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिल्लीत सुरू करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर दिल्लीतील एका मुलाची भूमिका साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -


हेही वाचा – Shershaah : मुलगा कॅप्टन विक्रम बत्रा शहीद होतानाचा सीन पाहून आई-वडीलांचे डोळे पाणावले


 

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -