घरताज्या घडामोडीपोलादपूरच्या वाकणमध्ये डोंगराला पडल्या भेगा, दरडीचे सावट कायम

पोलादपूरच्या वाकणमध्ये डोंगराला पडल्या भेगा, दरडीचे सावट कायम

Subscribe

या परिसरात सपाट भागात जमिनीला मोठ्या भेगा गेल्या असून, जमीन दुभंगली आहे.

गेल्या २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीने तालुक्यातील वाकण गावठाण, धामणीची वाडी, बौद्ध वाडी, कदमवाडी, बाबरवाडी, सानेमुरावाडी या ठिकाणी डोंगराला आणि जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असल्याने या परिसरावर भीतीची टांगती तलवार कायम आहे. मुसळधार पावसाने या परिसराला जोरदार तडाखा दिल्याने अनेक घरांना तडेही गेले आहेत. विशेष म्हणजे या घरांच्या उशाला दरडी, तर खालच्या भागात भातशेती असल्याने या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. डोंगराळ परिसरातील गाव-वाड्यांना भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वाकण गावठाण डोंगराच्या अतिदुर्गम भागात माथ्यावर वसलेले ४० घरांचे गाव आहे. धामणीची वाडीत १० घरे असून, त्यांना तडे गेले आहेत. तसेच तेथील भातशेतीचेही नुकसान झाले आहे.

या परिसरात सपाट भागात जमिनीला मोठ्या भेगा गेल्या असून, जमीन दुभंगली आहे. कदमवाडीसह बाबरवाडीत १० घरे असून, या भागात डोंगरावरून ओसरे आलेले आहेत. सानेमुरावाडी आणि बौद्धवाडीत प्रत्येकी १० घरे असून, सर्वांना तडे गेले आहेत. वाकण गावठाण येथील ग्रामस्थ निळकंठ साने यांनी या गाव आणि वाड्यांच्या परिसरात घरांना तडे, तर डोंगरांना ओसरे आणि जमिनीला भेगा पडल्या असल्याने शासनाच्या मदतीची गरज व्यक्त केली.

- Advertisement -

पूरग्रस्त जनावरांसाठी ५ टन पशुखाद्य वाटप

महाड, पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, पूर येणे अशा दुर्घटना घडल्या. यामध्ये जनतेची वैयक्तिक सर्व प्रकारची हानी झाली, याचबरोबर मुक्या जनावरांचेही हाल झाले. त्यांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. महाड तालुक्यातील खरवली, आसनपोई, बिरवाडी, आकले, ढालकाटी या पूरग्रस्त गावांतील जनावरांसाठी येथील श्री कच्छी जैन भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ५ टन खाद्य वाटप करण्यात आले.


हेही वाचा – १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून आग्रह नाही – राज्यपाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -