घरमनोरंजनअभिनेत्री उदिता गोस्वामी बनली दुसऱ्यांदा आई

अभिनेत्री उदिता गोस्वामी बनली दुसऱ्यांदा आई

Subscribe

अभिनेत्री उदिता गोस्वामी दुसऱ्यांदा आई झाली आहे. यावेळी तिने एका बाळाला जन्म दिला आहे. बाळ झाल्याची माहिती सोशल मीडियावर आल्यावर तिच्या फॅन्सने शुभेच्छा दिल्या आहेत.

कमी वेळेसाठी का होईना पण बॉलिवूडमध्ये आपल्या चित्रपटांनी ठसा उमटवणारी अभिनेत्री उदिता गोस्वामीने एका मुलाला जन्म दिला आहे. उदिता गोस्वामीचे हे दुसरे बाळ आहे. ही बातमी सोशल मीडियावरून शेअर करण्यात आली आहे. या बातमीनंतर तिच्या फॅन्सने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. उदिता गोस्वामी ‘अक्सर’ आणि ‘जहेर’ या चित्रपटात काम केले. उदिता सध्या ३४ वर्षाची आहे. तिने २०१३ मध्ये दिग्दर्शक मोहित सूरी याच्याशी लग्न केले. लग्नापूर्वी उदिता आणि मोहित यांच्यात ९ वर्ष प्रेमसंबध होते. चित्रपट निर्माता मिलाप जावेरी याने ट्विटरवरून ही माहिती शेअर केली आहे. मिलापने उदिताला शुभेच्छा देत ट्विट केले आहे.

 

View this post on Instagram

 

Pic by @shrutitejwaniphotography

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami) on

- Advertisement -

मोहित आणि उदिता यांना शुभेच्छा, ते आता एका मुलाचे पालक झाले आहेत. या दोघांना खूप प्रेम… असे मिलापने ट्विट केले आहे.

 

View this post on Instagram

 

Part 2 of the cropped pic. What kept me busy and missing in action. Pic by @shrutitejwaniphotography

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami) on

- Advertisement -

२०१५ मध्ये पहिल्यांदा आई

उदीता गोस्वामी आणि मोहित सुरी यांचा हा दुसरा मुलगा आहे. यापूर्वी २०१५ साली उदिताने एका कन्यारत्नाला जन्म दिला. ‘देवी’ असे तिचे नाव ठेवण्यात आले. उदिताचा शेवटचा चित्रपट ‘द डायरी ऑफ बटर फ्लाय’ हा होता. साल २००३ मध्ये पाप चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने अक्सर, जहर, अगर, रोक, किससे प्यार करुं, चेज, दिल दिया है या चित्रपटांमध्येही काम केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -