घरताज्या घडामोडीTokyo Olympic: नीरज चोप्रावर बॉलिवूडकरांच्या शुभेच्छांचा वर्षाव

Tokyo Olympic: नीरज चोप्रावर बॉलिवूडकरांच्या शुभेच्छांचा वर्षाव

Subscribe

टोकियो ऑलिम्पिक २०२० (Tokyo Olympic 2020)मध्ये भारताचा अ‍ॅथलीट नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आज एक नवा इतिहास रचला आहे. नीरजने भालाफेक स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यामुळे संपूर्ण देश नीरजला शुभेच्छा देत आहे. तसेच बॉलिवूड कलाकरांनी देखील नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

काय म्हणाले बॉलिवूड कलाकार वाचा….

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘हे गोल्ड आहे. इतिहास रचल्याबद्दल नीरज चोप्राला खूप साऱ्या शुभेच्छा. तू लाखो आनंद अश्रूचे कारण आहेस.’

- Advertisement -

तसेच बॉलिवूडचे ‘मिस्टर इंडिया’ म्हणजेच अनिल कपूर यांनी लिहिले आहे की, ‘गोल्ड, गोल्ड, गोल्ड, गोल्ड. अॅथलिटिक्समध्ये आपलं पहिलं गोल्ड, नीरज चोप्राचे अभिनंदन. संपूर्ण देशासाठी एक अद्भुत गर्वाचा क्षण आहे. इतिहास रचला आहे.’

- Advertisement -

अभिनेता रणदीप हुड्डाने नीरजसाठी लिहिले आहे की, ‘खैंच राख्या सै मीटर नीरज चोप्रा. आपण पदकाचा सर्वात मायावी रंग जिंकला आहे, असं वाटत आहे.’

‘टोकियो ऑलिम्पिकमधील विजयाबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. तुला बरीच ताकद मिळेल. तुने आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी केली आहे. मी किती आनंदी आहे, हे सांगू शकत नाही. हे खूप शानदार आहे,’ असे अजय देवगणने लिहिले आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली की, ‘हे गोल्ड आहे. मी आनंदाने उड्या मारत आहे. या तरुण नीरज चोप्राने इतिहास रचला आहे.’


हेही वाचा – neeraj chopra gold medals: ३७ वर्षांनंतर माझं अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं – पी.टी. उषा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -