घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ३३१ नव्या रुग्णांची वाढ, ५ जणांचा...

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ३३१ नव्या रुग्णांची वाढ, ५ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत ३३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३७ हजार १९३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ९४२ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख १४ हजार ६३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ४ हजार १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ६१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १२८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाख ४७ हजार ८२०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३३ हजार ८४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात राज्यात ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ६१ लाख ३९ हजार ४९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.७२ % एवढे झाले आहे.

- Advertisement -

ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नागपुरातील हॉटेल ट्रॅवोटेलमध्ये शोध घेतला.

- Advertisement -

भालाफेकीत नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळाले आहे. टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळाले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताची ही ऐतिहासिक कामगिरी आहे.


राफेल फायनलमध्ये नीरज चोप्रा सध्या अव्वल स्थानावर


भालाफेकमध्ये नीरज चोप्राची दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ची फेक


पैलवान बजरंग पुनियाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. भारताच्या यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे सहावे पदक आहे. बजरंगच्या विजयानंतर त्याचे सर्व स्थरातून कौतुक करण्यात येत आहे. हरियाणातही बजरंगच्या कुटुंबियांचा जल्लोष पहायला मिळत आहे.


भारतात जॉन्सन अँड जॉन्सनचा लसीच्या वापरला परवानगी दिल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. भारतात जॉन्स अँड जॉन्सनच्या सिंगल डोसला आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.


रुग्णालयातील ५८ रुग्णांना शेजारील इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. या ५८  पैकी २० रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. मात्र गॅस गळती नियंत्रणात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल एचपीएलच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे.


मुंबईच्या महापौर पाहणी करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाल्यात आहेत. शनिवारी सकाळी ११:३० वाजच्या सुमारास कस्तुरबा रुग्णालयातील LPG गॅस लिक झाला आहे.अग्निशम दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


माहिम बस स्थानकात ई-बसचा लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण जपलं गेलं पाहिजे. त्यासाठी बेस्ट हे पहिले पाऊल टाकले आहे. बेस्ट, लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. ई-बसेस हे बेस्टचं क्रांतीकारी पाऊल आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस लिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अग्निशम दलाच्या ४ गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे २ वॉटर टँक देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )


कोरोनामुळे दुकानांच्या वेळेवर निर्बंध आल्याने नागपूरात हॉटेल व्यावसायिक संपप्त झाले आहेत. नागपूरातील व्यावसायिक पालकमंत्री नितीन राऊत यांच्या भेटीला गेले आहेत. व्यावसायिकांकडून दुकानांच्या वेळी वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.


मुंबईतील मोकळ्या मैदानांचे आरक्षण रद्द केल्याने वांद्रे परिसरात भाजपचे आंदोलन सुरु आहे. सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ मुंबईत निदर्शने करण्यात येत आहेत.


जम्मू काश्मीरच्या बडगामच्या मोचवा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला आहे. या दहशतवाद्याकडून एक एके ४७ रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. घटनास्थळी शोध सुरु आहे.


लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पुण्यातील शहरातील कोव्हीशील्ड लसीचे सर्व केंद्र आज बंद असणार आहेत. लसीकरण केंद्र आता थेट सोमवारी सुरू होणार आहेत. सरकारकडून महापालिकेला शुक्रवारी देखील लस पुरविण्यात आलेली नाही, याचा फटका लसीकरण मोहिमेला बसलाय रविवारी महापालिकेने केंद्रांना सुट्टी दिलेली आहे, त्यामुळे या दोन दिवसात लस उपलब्ध झाली तर सोमवारीच लसीकरण सुरू होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -