घरमनोरंजनअक्षय कुमारने आसाम पूरग्रस्तांसाठी केली एक कोटींची मदत; सीएम सोनोवाल यांनी मानले...

अक्षय कुमारने आसाम पूरग्रस्तांसाठी केली एक कोटींची मदत; सीएम सोनोवाल यांनी मानले आभार

Subscribe

आसाममध्ये पूर आल्यामुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ परिस्थिती बिकट आहे. मागील महिन्यात झालेल्या भीषण पूरातून ३० लाखाहूनही अधिक लोक प्रभावित झाले. बिहारमध्येही लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पुन्हा एकदा आसाममधील पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यासाठी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्वीटद्वारे खिलाडी अक्षय कुमार यांचे आभार मानले आहेत. सीएम सोनोवाल यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, “आसाममधील पूरग्रस्तांसाठी एक कोटीच्या योगदानाबद्दल अक्षय कुमार जी यांचे आभार. तुम्ही नेहमीच संकटाच्या वेळी सहानुभूती व पाठिंबा दर्शविला आहे. आसामचा खरा मित्र म्हणून, या क्षेत्रात आपले कार्य वाढवण्यासाठी देव तुमच्यावर कृपा करो.”

जुलै २०२० मध्ये एका वेळी आसाममधील ३३ पैकी ३३ जिल्हे पूरजन्य परिस्थितीमुळे पाण्यात बुडले. सुमारे २८ लाख लोक पुरामुळे बाधित झाले. पुरामुळे हजारो घरांचे नुकसान झाले, पिके नष्ट झाली आणि बर्‍याच ठिकाणी रस्ते व पूल यांचा संपर्क तुटला होता. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व इतर सरकारी संस्था व स्वयंसेवी संस्था पूर मदत कार्यात व्यस्त आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

विशेष म्हणजे आसाममध्ये पूर आल्यामुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ परिस्थिती बिकट आहे. मागील महिन्यात झालेल्या भीषण पूरातून ३० लाखाहूनही अधिक लोक प्रभावित झाले. बिहारमध्येही लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे. यावेळी भारतातील बर्‍याच राज्यांत मुसळधार पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. विशेषत: महाराष्ट्रात धरण अतिवृष्टीमुळे ओसंडून वाहत आहे. हे पाहता पुण्यातील खड़गवासला धरणातून पाणी सोडावे लागले आहे.

यासह अक्षय कुमारने देशातील कोणत्याही प्रांतासाठी मदतीचा हात पुढे करण्याची ही पहिली वेळ नाही तर अनेकदा अक्षय कुमारने अशी मदत करून तो आपल्या धर्मादाय कार्यासाठी चर्चेत असतो.


सलमान खानच्या हत्येसाठी रेकी, पोलिसांनी केली एकाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -