घरताज्या घडामोडीनवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह

नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासहीत त्यांच्या परिवारातील तब्बल १२ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. तर नवनीत कौर राणा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नागपूर येथील वोकहार्ट रुग्णालयातून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्या उपचारांना त्यांनी उत्तम प्रतिसाद देखील दिला होता. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन त्या परतलेल्या होत्या. मात्र, नवनीत राणा यांचा पुन्हा एकदा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

नवनीत राणा यांना रविवारी १६ ऑगस्ट रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर २० दिवसांसाठी क्वारंटाइन राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण, मुंबई महापालिकेने डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा चाचणी केली असता नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

होम क्वारंटाइन राहण्याचा दिला सल्ला

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना दोन दिवस आधी लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रवी राणा यांना शनिवारी १४ ऑगस्ट तर नवनीत राणा यांना रविवारी १६ ऑगस्टला डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणे त्यांना जाणवत नव्हती. सोमवारी मुंबई पालिकेच्या डॉक्टरांकडून त्यांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना १५ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.


हेही वाचा – राज्यात पुढील 24 तास धो धो पाऊस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -