घरमनोरंजनAlia Bhatta ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री? 'गंगुबाई काठियावाडी' स्टारने दिले हे उत्तर

Alia Bhatta ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री? ‘गंगुबाई काठियावाडी’ स्टारने दिले हे उत्तर

Subscribe

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित’ गंगूबाई काठियावाडी या मोस्ट अवेटेड चित्रपटातील आलिया भट्टचा अभिनय प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. याचदरम्यान आलिया आता हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा नुकताच 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झाला. ज्या प्रेक्षकांना या महोत्सवात चित्रपट पाहण्याची संधी मिळाली त्यांच्याकडून सुरुवातीची प्रतिक्रिया खूप चांगली आहे. 25 फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात येईपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान एका वृत्तसंस्थेने आलियाला हॉलीवूड एन्ट्रीबाबत विचारले असता आलिया चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन म्हणाली की, मला अशी आशा आहे. मला असे म्हणायचे आहे की मी पुढे जाणे अपेक्षित आहे. पण जेव्हा जे व्हायला हवे तेव्हा ते होईल. काय सांगू आत्ताच काही बोलणे योग्य नाही.

- Advertisement -

आलियाच्या बॉलीवूडमधील प्रवासाबद्दल सांगायचे झाल्यास, बॉलिवूड इंडस्ट्रीत तिने गेल्या 10 वर्षात ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राझी’ आणि आता ‘गंगूबाई काठियावाडी’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. गंगूबाई काठियावाडीत ती एका माफिया क्वीनची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ व्यतिरिक्त आलियाचा ‘RRR’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ देखील याच वर्षी रिलीज होणार आहेत. तसेच यावर्षी ती ‘डार्लिंग्स’ चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

दरम्यान 2021 मध्येही आलिया हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरु होती. जुलै 2021 मध्ये आलिया भट्टने हॉलिवूड प्रोजेक्ट मिळविण्यासाठी इंटरनॅशनल टेलेंट एजेंन्सी विल्यम मॉरिस एंडेव्हर (WME) सोबत काही डिल केला होता. कारण तिला अमेरिकेत तिला अभिनेत्री म्हणून अधिक संधी मिळताना दिसतेय. ही एजेंन्सी जी गॅल गॅडॉट, एम्मा स्टोन, ओप्रा आणि चार्लीझ थेरॉन सारख्या इंटरनॅशनल स्टार्सचे काम पाहते.


Alia Bhatt : आलियाने सांगितला लग्नाचा दिवस ! म्हणाली रणबीर आणि मी …


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -