घरताज्या घडामोडीNawab malik arrested : अटकेच्या आधीच ट्विटरवर माहिती लीक, गृहमंत्र्यांचे EDच्या कारभारावर...

Nawab malik arrested : अटकेच्या आधीच ट्विटरवर माहिती लीक, गृहमंत्र्यांचे EDच्या कारभारावर बोट

Subscribe

अतिशय दुर्दैवीच गोष्ट काय कारणे ईडी देते ही महत्वाची गोष्ट. एखादा पक्ष किंवा व्यक्तीच्या विरोधात अशा रितीने वागण्याची आवश्यकता नाही. ईडीने अटक केल्याचे कळते. कायदेशीर लढाई पुढे सुरू होईल. कारण काहीही शोधता येतात. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजप नसलेल्या सगळ्या ठिकाणी होतच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात सूडबुद्धीने टार्गेट करून अशी कारवाई करण्यात येत आहे. पण या या प्रकरणात नवाब मलिक निर्दोष असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्र सरकारने केंद्रीय यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने करून अनेक लोकांना टार्गेट केले आहे. माझा पूर्ण विश्वास नवाब मलिक हे पूर्णपणे निर्दोष आहेत.नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नोटीस देणे अपेक्षित होते. त्यांना रात्री अपरात्री चौकशीसाठी घेऊन जाणे हे लोकशाहीच्या विरोधी आहे. तसेच सामान्य माणसाच्या हक्काच्याही विरोधात आहे.

केंद्रीय यंत्रणा जेव्हा कारवाया करतात, तेव्हा ट्विटच्या माध्यमातून जनतेला माहिती मिळते. याचा अर्थ हे ठरवून केले जाते आणि ठरवून लीक करण्यातही येते. राजकारणासाठी जात धर्म आणखी कोणत्याही गोष्टीचा वापर केला जाऊ नये हे खरच आहे. पण नवाब मलिक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विषय अजेंड्यावर आणले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार तयार झाल्यापासूनच अशा कारवाया सुरू आहेत. अनेक लोकांना त्रास दिला जात असल्याचेही समोर आले आहे. पण अशा प्रकरणांमुळे सरकार अडचणीत असल्याचे वाटत नाही.

- Advertisement -

राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचे आणखी उदाहरण आज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईतून दिसून आले. केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.


Nawab Malik Arrested : नवाब मलिक अटकेनंतर मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांना फोन, सायंकाळी वर्षावर खलबतं

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -