घरमनोरंजनरणवीरबद्दल काहीही वाईट बोलायला आणि ऐकायला आवडत नाही...रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटला आलियाचं...

रणवीरबद्दल काहीही वाईट बोलायला आणि ऐकायला आवडत नाही…रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटला आलियाचं समर्थन

Subscribe

आलिया भट्टने तिच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्च दरम्यान रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर मोकळेपणाने आपलं मत मांडलं

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एका मॅगजीनसाठी त्याने हे फोटोशूट केलं होतं. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, शिवाय काही जणांनी तर त्याच्या अतरंगी फोटोंवर मिम्स सुद्धा तयार केले. दरम्यान आता, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकार त्याची पाठराखण करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या फोटोंवर कमेंट्स करत आपलं मत मांडलं होत. याशिवाय आता अभिनेत्री आलिया भट्टने सुद्धा रणवीरची पाठराखण केलेली आहे.

आलियाने केली रणवीरची पाठराखण

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

आलिया भट्टने तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्च दरम्यान रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर मोकळेपणाने आपलं मत मांडलं. एका पत्रकाराने आलियाला रणवीरच्या फोटोशूटबाबत एक प्रश्न विचारला, तेव्हा आलिया म्हणाली की, “मला माझ्या आवडत्या रणवीर सिंह बद्दल काहीही वाईट बोलायला आणि ऐकायला आवडत नाही. मी त्याच्यावर नेहमीच प्रेम करते आणि तो फक्त माझाच नाही तर प्रत्येकाचा आवडता कलाकार आहे. रणवीरने खूप उत्तम चित्रपट दिले आहेत, त्यामुळे आपण त्याला नेहमी प्रेम द्यायला हवे.”

अर्जुन कपूर ने सुद्धा केली होती रणवीरची पाठराखण
आलिया आधी अर्जुन कपूरने सुद्धा रणवीरच्या बाजूने आपलं मत मांडले होते. या फोटोशूटवर प्रतिक्रिया देत अर्जुन म्हणाला होता की, “रणवीरमध्ये कोणताच दिखावा नाही. जर तुम्ही रणवीरला ११-१२ वर्षांपासून ओळखत असाल, तर तुम्हाला हे सुद्धा ठाऊक असेल की, तो त्याच्या पर्सनालिटीचा एक भाग आहे. त्याने जे काही केलं, ती त्याची इच्छा आहे. मला वाटतं आपल्याला त्यांचा आदर करायला हवा.”


हेही वाचा :सलमान खाननंतर कतरिना आणि विक्कीला मिळाली ठार मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -