घरमनोरंजनसलमान खाननंतर कतरिना आणि विक्कीला मिळाली ठार मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात तक्रार...

सलमान खाननंतर कतरिना आणि विक्कीला मिळाली ठार मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Subscribe

मुंबई पोलिसांच्या साइबर शाखेने या आरोपीची ओळख काढली आहे. हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करत होता,तसेच तिच्या फोटोंवर अश्लील कमेंट देखील करत होता

बॉलिवूडमधील स्टार कपल विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांना जिवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. ज्यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीं विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती कतरिनाला कैफला खूप दिवसांपासून सोशल मीडियावर स्टॉक करत होता. तसेच त्याने सोशल मीड्याच्या माध्यमातून कतरिना कैफला आणि विक्की कौशलला जीवे मारण्याची धमकी दिली होती. विक्कीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.

मुंबई पोलिसांची साइबर शाखेने या आरोपीची ओळख काढली आहे. हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करत होता,तसेच तिच्या फोटोंवर अश्लील कमेंट देखील करत होता. पोलिसांनी या आरोपी विरोधात भारतीय ५०६ आणि ३५४ डी याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आईटी अॅक्ट ६७ (अश्लील फोटो, व्हिडीओ आणि कमेंट करणे) याअंतर्गत देखील आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी सांगितलं की, आरोपी कतरिना कैफला इंस्टाग्रामवर स्टॉक करत होता आणि त्याने इंस्टाग्रामवर कतरिनाला जिवे मारण्याच्या धमकीचे मॅसेजही पाठवले होते. यासंदर्भात विक्की कौशलने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

सलमान खानला सुद्धा मिळाली होती धमकी
नुकत्याच काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याच्या वडीलांना सुद्धा एका पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. सलमान खानला वांद्रेमध्ये हे पत्र मिळालं होतं. या घटनेनंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


हेही वाचा :‘स्वयंवर मिका दी वोटी’चा पार पडला फिनाले, मिकाने १३ वर्षं जुन्या मैत्रिणीची केली पत्नी म्हणून निवड

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -