घरमनोरंजनAmazon prime video: आगामी रियालिटी शो "LOL-हँसे तो फसे"चा ट्रेलर रिलीज !

Amazon prime video: आगामी रियालिटी शो “LOL-हँसे तो फसे”चा ट्रेलर रिलीज !

Subscribe

पहिल्यांदाच या मंचावर केवळ विनोदाचीच परीक्षा होणार नसून, आपल्या संयमाची देखील कसोटी लागणार आहे.

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने आपल्या आगामी अॅमेझॉन ओरिजनल सीरीज़ ” “LOL – हँसे तो फसे”चा अधिकृत ट्रेलर प्रकाशित केला आहे. अंतराष्ट्रीय अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज ‘लोल’च्या या प्रादेशिक एडिशनमध्ये कॉमेडियन्सची एक अख्खी फळी प्रेक्षकांना दिसणार आहे, ज्यांनी भारतात विनोदाच्या मंचावर आपला अमीट ठसा उमटवला, अर्शद वारसी आणि बोमन ईरानी हे या सिरिजचे मुख्य होस्ट असणार आहेत.

 या विनोदाच्या फळीत हरहुन्नरी कलाकारांची वर्णी लागली आहे. आदार मलिक, आकाश गुप्ता, अदिति मित्तल, अंकिता श्रीवास्तव, साइरस ब्रोचा, गौरव गेरा, कुशा कपिला, मल्लिका दुआ, सुनील ग्रोवर आणि सुरेश मेनन यामध्ये कडव्या आव्हानांना सामोरे जाताना दिसणार आहेत.कदाचित पहिल्यांदाच या मंचावर केवळ विनोदाचीच परीक्षा होणार नसून, आपल्या संयमाची देखील कसोटी लागणार आहे. “LOL – हँसे तो फसे” या रियालिटी शो साठी सज्ज व्हा तसेच ही मालिका तुमच्या मनोरंजना मध्ये डबल वाढ होण्यासाठी 30 एप्रिलला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – आकाश अंबानीच्या लग्नामधील व्हायरल व्हिडीओवरून शाहरुख खानला केलं जातंय ट्रोल…

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -