घरदेश-विदेशRailway GDMO Recruitment 2021: कोरोना ड्यूटीसाठी Online मुलाखतीद्वारे थेट भरती; महिना ७५...

Railway GDMO Recruitment 2021: कोरोना ड्यूटीसाठी Online मुलाखतीद्वारे थेट भरती; महिना ७५ हजार पगार

Subscribe

कोरोनादरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर रेल्वेने नोकरीची सुवर्ण संधी निर्माण केली आहे. दक्षिण रेल्वेने पूर्णवेळ कंत्राटी वैद्यकीय व्यवसायिक पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. रेल्वे रुग्णालय, पेरंबूर चेन्नई येथील कोविड १९ वार्डमध्ये उमेदवारांना ड्युटीवर नियुक्त करण्यात येणार आहे. उमेदवारांची ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने असून आणि ठराविक मुदतीसाठी असणार आहे. या पदाची भरती थेट ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेऊन करण्यात येणार आहे. तसेच निवडलेल्या उमेदवारांना लवकरच पोस्टिंग देण्यात येणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अधिकृत जाणून घेण्यासाठी उमेदवारांना sr.indianrailways.gov.in वर भेट देऊन सविस्तर पाहाता येणार आहे.

एकूण ३३ GDMO पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. त्यापैकी १७ पदे अनारक्षित, ९ ओबीसी, ५ एससी आणि २ एसटी प्रवर्गासाठी असणार आहेत. अधिसूचनेनुसार, MBBS पदवी धारक उमेदवार आयसीयू आणि व्हेंटिलेटरमध्ये काम करण्याचा अनुभव असलेले किंवा पदवीचा एक वर्षाचा अनुभव असणारे उमेदवार या पदांवर भरतीसाठी पात्र असतील. निवड झालेल्या उमेदवारांना ७५ हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

- Advertisement -

या पदाकरता अर्ज करायचे असल्यास कमीत कमी वयमर्यादा ५३ निश्चित करण्यात आले आहे. तसेच त्यामध्ये प्रवर्गानुसार सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. अनुभव असणार्‍या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराने अर्ज भरून त्याच्या स्कॅन कॉपीसह सगळे कागदपत्र [email protected] या मेलवर पाठवणं आवश्यक असणार आहे .अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२१ पर्यंत असून पात्र उमेदवाराची निवड करून त्यांची मुलाखत घेऊन निवड करण्यात य़ेणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -