घरक्रीडालाहौल टाकणार धर्मशाळाला मागे! उभारणार जगातील सर्वात उंच ठिकाणचे क्रिकेट स्टेडियम

लाहौल टाकणार धर्मशाळाला मागे! उभारणार जगातील सर्वात उंच ठिकाणचे क्रिकेट स्टेडियम

Subscribe

हे स्टेडियम समुद्र सपाटीपासून १० हजार फूट उंचीवर असणार आहे.

भारतातील किंवा जगातील सर्वात सुंदर क्रिकेट मैदान म्हणून धर्मशाळाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नाव घेतले जाते. हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. मात्र, लवकरच हिमाचलच्या लाहौल व्हॅलीमधील सिसू येथे जगातील सर्वात उंच ठिकाणावर असलेले क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. अटल बोगदा या जगातील सर्वात मोठ्या बोगद्याच्या शेजारी हे स्टेडियम होणार असून समुद्र सपाटीपासून १० हजार फूट उंचीवर असणार आहे. या स्टेडियमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे आदिवासी फंडातून उभारले जाणार आहे.

स्टेडियम बांधण्यासाठी लवकरच परवानगी

या स्टेडियममध्ये १० हजार आसनसंख्या असणार आहे. लाहौल-स्पिती क्रिकेट असोसिएशन या स्टेडियमसाठी २०१३ पासून काम करत आहे. आता लवकरच त्यांना हे स्टेडियम बांधण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन, पंचायत आणि रहिवासी क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी उत्सुक असल्याचे लाहौल-स्पिटी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर म्हणाले. मे ते ऑक्टोबर या कालावधीत या स्टेडियममध्ये क्रिकेटचे सामने होऊ शकतील. मात्र, पहिल्या बर्फवृष्टीनंतर हिवाळ्यात हे स्टेडियम बंद ठेवावे लागेल, असेही ठाकूर यांनी नमूद केले.

- Advertisement -

सध्या धर्मशाळाच्या नावे विक्रम

सध्या धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे हे जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. समुद्र सपाटीपासून ४ हजार ७८० फूट उंचीवर असलेले हे स्टेडियम २००३ मध्ये बांधण्यात आले होते. या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय, तसेच आयपीएलचे सामने झाले आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -