घरमनोरंजनब्रेकअपच्या चर्चांदरम्यान टायगर श्रॉफने केलं दिशाच्या 'एक व्हिलन रिटर्न'चं कौतुक

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान टायगर श्रॉफने केलं दिशाच्या ‘एक व्हिलन रिटर्न’चं कौतुक

Subscribe

टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'एक व्हिलन रिटर्न'चा एक पोस्टर शेअर करत सोबतच त्याने लिहिलं की, काय मनोरंजक चित्रपट आहे आणि पूर्ण कास्टने सुंदर अभिनय केला आहे

मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सर्वत्र चालू होती. ६ वर्षाच्या नात्या नंतर दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांनीही याबाबत काहीच स्पष्ट केलं नाही. यासगळ्या दरम्यानचं दिशा पटानीचा ‘एक व्हिलन रिटर्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाचया पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७.०५ कोटींची कमाई केली. दरम्यान, या चित्रपटाची एक स्टोरी शेअर करत अभिनेता टायगर श्रॉफने दिशा पटानी, अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि जॉन अब्राहम यांचं कौतुक केलं आहे.

टायगर श्रॉफने दिशा पटानीला दिल्या शुभेच्छा

- Advertisement -


टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘एक व्हिलन रिटर्न’चा एक पोस्टर शेअर करत सोबतच त्याने लिहिलं की, काय मनोरंजक चित्रपट आहे आणि पूर्ण कास्टने सुंदर अभिनय केला आहे. सगळ्यांना अभिनंदन. टायगर श्रॉफने आपल्या पोस्टमध्ये दिशासोबतचं पूर्ण कास्टला आणि दिग्दर्शकांना टॅग केलं आहे.

दिशा आणि टायगरचा ब्रेकअप
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपबाबत चर्चा चालू होत्या. टायगरच्या मित्राने याबाबत खुलासा केला होता. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, दिशाने टायगरकडे लग्न कराण्याबाबत सांगितले होते. मात्र टायगरने दिशाला सांगितले की, तो अजून लग्नासाठी तयार नाही.

- Advertisement -

दिशा पटानीचा ‘एक व्हिलन रिटर्न’
दिशा पटानीचा ‘एक व्हिलन रिटर्न’ चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्याशिवाय जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या एक व्हिलन या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख होते.


हेही वाचा :६ वर्षाच्या नात्यानंतर दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचा झाला ब्रेकअप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -