घरमनोरंजन'आरआरआर' चित्रपटावरून राजामौली भडकले नेटफि्लक्सवर

‘आरआरआर’ चित्रपटावरून राजामौली भडकले नेटफि्लक्सवर

Subscribe

या चित्रपटाला जेम्स गन, स्कॉट डेरिकसन आणि रुसो ब्रदर्स सोबतच हॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. परंतु यादरम्यान राजामौली यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफि्लक्सवर संताप व्यक्त केला आहे

एसएस राजामौली यांचा आरआरआर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. चित्रपटगृहात धमाकेदार कमाई केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर सुद्धा रिलीज करण्यात आला आहे. राम चरण आणि जूनियर एनटीआरच्या या चित्रपटाला जेम्स गन, स्कॉट डेरिकसन आणि रुसो ब्रदर्स सोबतच हॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. परंतु यादरम्यान राजामौली यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफि्लक्सवर संताप व्यक्त केला आहे.

नुकतेच एसएस राजामौली अभिनेता धनुषच्या पहिल्या हॉलिवूड ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी मीडिया समोर आले. यावेळी त्यांनी नेटफ्लिक्सबाबत वाटणारी नाराजी व्यक्त केली. त्यांनी आरआरआर या चित्रपटाचं फक्त हिंदी वर्जनलाचं आपल्या प्लॅटफॉर्मवर जागा दिली आहे. सोबतचं त्यांनी नेटफि्लक्सवर हा आरोप लावला की, आरआरआर चित्रपटाचं मूळ तेलगू संस्करण आणि इतर चार भाषांचे वर्जन वगळण्यात आले आहेत. राजामौली म्हणाले, मी वास्तवमध्ये नेटफि्लक्सशी नाराज आहे कारण त्यांनी केवळ या चित्रपटाचे हिंदीचं घेतले आणि इतर भाषा वगळल्या. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल तक्रार आहे. मी पश्चिमी देशांच्या प्रतिक्रियेवरून आश्चर्यचकित झालो आहे.

- Advertisement -

राजामौली पुढे म्हणाले की, पश्चिमी देशांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं, या गोष्टीमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. एक चांगली गोष्ट सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. परंतु मला नव्हतं वाटत की, मला स्वताःवर विश्वास नव्हता. त्यामुळेच हा चित्रपट जेव्हा नेटफ्लिक्सवर आला आणि लोकांनी तो पाहायला सुरूवात केली. त्यानंतर प्रेक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. या चित्रपटाला वर्ल्ड ऑफ माउथ पब्लिसिटी मिळाली. माझ्यासाठी हे सर्व आश्चर्यचकित करणारं होतं. परंतु नेटफ्लिक्सशिवाय हे शक्य झालं नव्हतं आणि त्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे.


हेही वाचा :ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ द्या!

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -