घरमनोरंजनAmitabh Bachchan यांचा नातू अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Amitabh Bachchan यांचा नातू अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Subscribe

सोमवारी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा नातू अगस्त्य नंदा याला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी आशीर्वाद देत एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी अगस्त्यचे कौतुक करत त्याच्यावर खूप गर्व असल्याचे म्हटले.

बॉलिवूड किंग अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. इतकचं नव्हे तर ते अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव असतात, जिथे त्याचे करोडो चाहते त्यांच्याशी जोडलेले असतात. अतिमाभ बच्चन आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात, याशिवाय ते त्यांच्या चाहत्यांना सणांच्या शुभेच्छा सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात. नुकतीच त्यांनी त्यांचा नातू अगस्त्य नंदा याला बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याबाबत शुभेच्छा देत ही माहिती सर्वांना दिली आहे.

सोमवारी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा नातू अगस्त्य नंदा याला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी आशीर्वाद देत एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी अगस्त्यचे कौतुक करत त्याच्यावर खूप गर्व असल्याचे म्हटले. अमिताभ पोस्टमध्ये म्हणाले की, अगस्त्यने नेटफ्लिक्स ची लाइव-अॅक्शन, म्यूजिक फिल्म ‘द आर्चीज’ साठी शूटिंग सुरू केले आहे.

- Advertisement -

अमिताभ यांनी पोस्टमध्ये लिहिले की, अगस्त्य त्याच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करत आहे. त्यामुळेच आमच्यासाठी याहून मोठा कोणताच आनंद नसू शकतो. माझं प्रेम, माझा आर्शीवाद आणि माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्यासोबत आहेत. चांगलं कर आणि यशाचा झेंडा नेहमी फडकावत रहा. अगस्त्यचा हा चित्रपट जोया अख्तर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘द आर्चीज’ मध्ये कॉमिक पुस्तकाच्या ‘आर्ची एंड्रयूज’ या रूपात दिसून येईल.

- Advertisement -

या पोस्टमध्ये अमिताभ म्हणाले की, या चित्रपटात अगस्त्य नंदा सोबत शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर या दोघी सुद्धा त्यांच्या करिअरची सुरूवात करत आहेत. अगस्त्य नंदा या अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिचा मुलगा आहे.

 

हेही वाचा :&न्स्टि#8220;इट्यूट ऑफ पावटॉलॉजी” हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -