घरमनोरंजन'पेट पुराण' 6 मे पासून सोनी LIV वर प्रसारित

‘पेट पुराण’ 6 मे पासून सोनी LIV वर प्रसारित

Subscribe

पेट पुराण आता मराठीसह, हिंदी, तमीळ, तेलगू, मल्यामळ, कन्नड आणि बंगाली भाषेत दाखवण्यात येईल.

सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची नावाजलेली मराठी वेब सीरिज पेट पुराण येत्या 6 मे पासून सोनी LIV वर प्रसारित होणार आहे. पेट पुराण या वेब सीरिजमध्ये आधुनिक काळातील, नोकरी करणाऱ्या जोडप्यांना नोकरीमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांचा कुटुंब पूर्ण करण्याकडे अधिक पारंपारिक दृष्टिकोन नाही. त्यांचे कुटुंब कसे चालेल. समाज त्यांच्या या अपारंपारिक निवडीवर कशी काय प्रतिक्रिया देतो? हे या वेब सीरिज मधून पाहायला मिळेल.

- Advertisement -

6 मे पासून सोनी LIV वर प्रसारित होणार्‍या, शोमध्ये सई ताम्हणकर अंजलीच्या भूमिकेत आणि ललित प्रभाकर अतुलच्या भूमिकेत आहेत. पेट पुराणचे दिग्दर्शन आणि लेखन ज्ञानेश झोटिंग यांनी केले आहे, ह्यूज प्रॉडक्शनचे रणजित गुगळे यांनी याची निर्मिती केली आहे. तसेच पेट पुराण आता मराठीसह, हिंदी, तमीळ, तेलगू, मल्यामळ, कन्नड आणि बंगाली भाषेत दाखवण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -