घरमनोरंजनVideo: अमृताने शेअर केला 'बाला' चॅलेंजचा व्हिडिओ!

Video: अमृताने शेअर केला ‘बाला’ चॅलेंजचा व्हिडिओ!

Subscribe

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारचा २२ नोव्हेंबरला हाऊसफुल ४ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षय कुमार याने बॉलिवूड कलाकारांना दिलेला ‘बाला चॅलेंज’ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. अक्षयचे हे चॅलेंज अनेक बॉलिवूडकरांनी पुर्ण केले आहे. यात वरूण धवन,रणवीर सिंग,करिना कपूर,अर्जून कपूर,कियारा अडवाणी या कलाकारांचा समावेश आहे. अक्षयचे हे चॅलेंज अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरातील एका चिमुकल्याने स्विकारले आहे. अमृता खानविलकरनेही तिच्या घरातील सुपर क्युट डान्सरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

या व्हीडीओत हा चिमुकला अक्षय कुमारच्या बाला या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.“आमच्या घरातील या क्युट बाला डान्सरला एकदा पाहाच, त्याच्या डान्स स्टेप पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.” असे म्हणत अमृताने हा व्हीडीओ ट्विट केला आहे. या पोस्टमध्ये तिने अक्षय कुमार आणि रितेश देशमुखला टॅग केलं आहे.

अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट आयुष्यमानपेक्षा अक्षय कुमारच्या ‘बाला चॅलेंज’मुळेच जास्त चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -