घरमनोरंजन'हा' व्हिडीओ पाहूून कॅट आणि विक्कीच्या अफेरची पुन्हा चर्चा

‘हा’ व्हिडीओ पाहूून कॅट आणि विक्कीच्या अफेरची पुन्हा चर्चा

Subscribe

बॉलीवुडच्या दिवाळी पार्टीमध्ये विक्की आणि कटरीना एकत्र दिसले.

बॉलीवुडमध्ये अभिनेत्यांमध्ये अफेर चालू असल्याच्या अनेक अफवां उठतात.  त्यातील काही गोष्टी खऱ्या असतात तर काही नुसत्या अफवा असतात. अशीच एक गोष्ट सध्या चर्चेत आहे ती म्हणजे अभिनेता विक्की कौशल आणि कतरीना कैफ एकमेकांना डेट करत असल्याची. गोष्ट तर ही देखील होती की विक्की कौशलचं हरलीन सेठी सोबत ब्रेक अपचं कारण त्याच्या आणि कतरीनाच्या वाढत्या जवळकीचं होतं. या सगळ्यामध्ये आता विक्की आणि कतरीनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून  पुन्हा एकदा दोघांच्या अफेरची चर्चा बी-टाउनमध्ये सुरू झाली आहे. एका कॉमन फ्रेंडच्या दिवाळी पार्टीसाठी हे दोन्ही स्टार गेले होते. पार्टीतून दोघे एकत्र बाहेर पडले पण मीडियाला पाहताच दोघे वेगळे झाले.

- Advertisement -

पार्टीतून निघताच मीडियाला पाहताच कतरीना लपली आणि विक्की तिला दुर्लक्ष करत आपल्या गाडीत बसून निघून गेला. भिंतीपाठी लपलेल्या कतरीनाचा लेहेंगा या व्हिडीओत दिसतो आणि त्याने स्पष्ट होतं की कटरीना तिथे आहे. या नंतर कतरीनाची गाडी तिच्याकडे पोहोचते आणि ती गाडीत बसून निघून जाते. सगळ्यांना हाच प्रश्न पडला आहे की जर दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे तर त्यात लपवण्याची काय गोष्ट आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -