घरमनोरंजनमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे आज निधन झाले. शांता तांबे यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शांता तांबेंच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. शांता तांबेंनी नाटकात काम करून अभिनय कारकिर्दीला सुरुवाती केली. यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.

शांता तांबे यांनी मराठी चित्रपटी सृष्टीत 7 दशके त्यांनी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. वाढत्या वयामुळे शांता तांबेंनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. शांता तांबे यांचे कोल्हापूर राहत होत्या. नुकतेच शांता तांबेंनी ‘तुझ्यात जीव रंगला’ यामालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती.

- Advertisement -

भालजी पेंढारकर , दिनकर पाटील, अनंत माने यांच्यासह अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत शांता तांबे यांनी काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोहित्यांची मंजुळा , सवाल माझा ऐका , मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी अशा चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -