घरक्रीडाIPL 2022: गौतम गंभीरचा 'तो' मास्टरस्ट्रोक पडला धोनीवर भारी

IPL 2022: गौतम गंभीरचा ‘तो’ मास्टरस्ट्रोक पडला धोनीवर भारी

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईचा दुसरा पराभव झाला आहे. लखनऊनं ६ गडी राखून सीएसकेचा पराभव करत चालू पर्वातील पहिला विजय मिळवला आहे. या विजयानंतर गौतम गंभीरनं शेवटच्या क्षणी खेळलेल्या मास्टरस्ट्रोकमुळे चेन्नईचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईचा दुसरा पराभव झाला आहे. लखनऊनं ६ गडी राखून सीएसकेचा पराभव करत चालू पर्वातील पहिला विजय मिळवला आहे. या विजयानंतर गौतम गंभीरनं शेवटच्या क्षणी खेळलेल्या मास्टरस्ट्रोकमुळे चेन्नईचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. हा मास्टरस्ट्रोक म्हणजे. दीपक हुड्डा बाद झाल्यावर अनुभवी खेळाडू म्हणून कृणाल पांड्याला पाठवण्याऐवजी आयुष बदोनी याला फंलदाजीसाठी पाठवलं.

लखनऊला विजयासाठी १६ चेंडुत ४० धावांची गरज होती. त्यावेळी १८ व्या षटकात दीपक हुड्डा बाद झाला. हुड्डा बाद झाल्यानंतर अनुभवी खेळाडू म्हणून कृणाल पांड्या फलंदाजीसाठी येईल, असा सर्वांचा अंदाज होता. पण गंभीरनं नवोदीत आयुष बदोनी याला फलंदाजीसाठी पाठवलं.

- Advertisement -

लखनऊच्या टीममध्ये ‘बेबी एबी’ या नावावं बदोनी प्रसिद्ध आहे. दिल्लीच्या या तरूण खेळाडूनं कमी कालावधीत गंभीरचा विश्वास संपादन केला आहे. बदोनी हा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत असल्यानं त्याचा खेळ धोनी किंवा सीएसकेच्या अन्य खेळाडूंना माहिती नव्हता. त्यामुळं अष्टपैलू कृणालच्याऐवजी स्पेशालिस्ट बॅटर असलेल्या बदोनीला पाठवण्याची चाल गंभीरनं खेळली. गंभीरची ही चाल मास्टरस्ट्रोक ठरली. त्याने एव्हिन लुईससोबत पाचव्या विकेटसाठी १९ बॉलमध्ये नाबाद ४० धावांची भागिदारी करत लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

- Advertisement -

शेवटी लुईस आणि आयुष बदोनी यांनी संघाला सावरत अशक्य वाटत असलेले काम करुन दाखवले. शेवटच्या षटकात सात धावांचे लक्ष्य बदोनीने असताना पहिल्याच चेंडूमध्ये जोराचा षटकार लगावला. त्यानंतर पाच चेंडूमध्ये एक धाव करावयची असल्यामुळे सामना लखनऊच्या बाजूने झुकला. त्यानंतर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आयुषने जोराचा फटका मारत धाव घेतली. परिणामी लखनऊने सहा गडी आणि तीन चेंडू राखून विजय नोंदवला.

चेन्नई आणि लखनऊ यांच्यात रंगलेल्या या समान्यात आश्चर्यकारक पद्धतीने लखनऊने दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने ठेवलेले २१० धावांचे लक्ष्य लखनऊने सहा गडी आणि तीन चेंडू राखून गाठले. लखनऊच्या या विजयासाठी क्विंटन डी कॉक तसेच के एल राहुल यांनी मोठी मेहनत घेतली. तर डी कॉक आणि राहुल यांच्या प्रयत्नांना पुढे नेत लुईसने नाबाद ५५ धावांचा खेळ करत लखनऊला विजय मिळवून दिला.


हेही वाचा – IPL 2022: ड्वेन ब्रावोनं रचला इतिहास; आयपीएलमध्ये ठरला सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -