घरमनोरंजन'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरींना ब्रेन स्ट्रोकच्या उपचारानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

‘बालिका वधू’ फेम सुरेखा सीकरींना ब्रेन स्ट्रोकच्या उपचारानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Subscribe

अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता त्यानंतर त्यांना ९ सप्टेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

‘बालिका वधू’ मधील ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना जुहूच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. नॅशनल अ‍ॅवॉर्ड विजेता अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता त्यानंतर त्यांना ९ सप्टेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास १५ दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, डॉ. आशुतोष शेट्टी यांनी ७५ वर्षांच्या सुरेखा या रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार केले. डॉक्टरांनी सांगितले, स्ट्रोकनंतर लवकरच सुरेखाजींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरुवात झाली. आता त्या लोकांना ओळखू लागल्या आहेत मात्र अजूनही त्यांना चालताना आधाराची गरज भासत आहे. यासह त्यांना पुन्हा शूटिंग सुरू करण्यापूर्वी काही काळ आरामाची आवश्यकता आहे. त्यानंतर त्या कामावर पुन्हा परत येऊ शकतात.

- Advertisement -

दरम्यान, सुरेखा सीकरी यांना याआधी २०१८ मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. यामुळे सुरेखाजींना अर्धांगवायूचा झटकाही आला होता. त्यातून त्या बऱ्यादेखील झाल्या मात्र जास्त काम करु शकल्या नाही त्यामुळे त्यांनी आर्थिक परिस्थिती खालावली. रिपोर्टनुसार सुरेखा सीकरी यांचा महिन्यांचा औषधांचा खर्च २ लाखांपेक्षा जास्त आहे. सुरेखा यांनी सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून तीन वेळा नॅशनल अ‍ॅवॉर्ड जिंकला आहे. सिनेमांशिवाय त्यांनी सांझा चूल्हा, सात फेरे : सलोनी का सफर आणि बालिका वधू सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.


Corona: सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -