घरमनोरंजनदाक्षिणात्य, हिंदी गाण्यांचा सुमधूर आवाज हरपला; बालसुब्रमण्यम यांच्या निधनावर प्रतिक्रिया

दाक्षिणात्य, हिंदी गाण्यांचा सुमधूर आवाज हरपला; बालसुब्रमण्यम यांच्या निधनावर प्रतिक्रिया

Subscribe

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज, शुक्रवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतरपासून ते कोरोनाच्या आजारावर उपचार घेत होते. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या बालसुब्रमण्यम यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खुपच खालावली होती. अखेर आज त्यांची आजाराशी झुंज संपली. कोरोनाने आणखी एक कलावंताचा बळी घेतला आहे. त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सिनेजगतातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात आली आहे. तसेच राज्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेले संगीताचे वरदान ‘एसपीं’नी आपल्या सुरांनी आणखी झळाळून टाकले. त्यांनी सोळा भाषांतून हजारो गाणी गायली, तीही विविध प्रकारची. यातून सुरांवर हुकूमत गाजविणाऱ्या ‘एसपीं’नी आपला एक रसिक वर्ग निर्माण केला. संगीत हे भाषा आणि प्रांत या पलिकडे असते हे सिद्ध करत ‘एसपीं’नी आपल्या नाद-मधूर सुरांनी भारतासह जगातील रसिकांना मोहवून टाकले. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. अगदी अलीकडे त्यांनी मराठीतही एक गाणे आपल्या मनस्वी शैलीत गायिले होते. कोरोनाशी झुंज देत असणाऱ्या या सुरांच्या दूनियेतील अवलियाला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील, ते त्या अर्थाने अजरामर आहेत. पण एक मनस्वी कलाकार आपल्यातून निघून जाणे दुःखद आहे. ज्येष्ठ गायक एस. पी. सुब्रमण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- Advertisement -

- Advertisement -

हेही वाचा –

Corona: सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -