घरताज्या घडामोडीबिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून 'कोण होणार करोडपती'चं कौतुक

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून ‘कोण होणार करोडपती’चं कौतुक

Subscribe

'कोण होणार करोडपती' आणि 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमांचं पहिल्यांदाच एकसाथ चित्रीकरण

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सगळ्यांच्या पसंतीस उतरतो आहे.  अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. हिंदी कार्यक्रमाप्रमाणे मराठी करोडपती देखील चांगलेच गाजले.  या कार्यक्रमाचं चित्रीकरण मुंबई फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. ‘कोण होणार करोडपती’ आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमांचं पहिल्यांदाच एकसाथ चित्रीकरण होतं आहे. (Big B Amitabh Bachchan Appreciate kon honaar crorepati)

- Advertisement -

12 जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ सुरू झालं होतं. या दोन्ही कार्यक्रमांचं चित्रीकरण हे शेजारीशेजारी असलेल्या सेट्सवर सुरू आहे.

- Advertisement -

सचिन खेडेकर यांनी कौन बानेगा करोडपतीच्या सेटवर जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.

 

तेव्हा अमिताभ बच्चन यांनी ‘कोण होणार करोडपती’चं भरभरून कौतुक केलं आणि हा कार्यक्रम पाहिल्याचा आवर्जून उल्लेख केला.


हेही वाचा – प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री ‘143’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -