घरताज्या घडामोडीज्योती देवरे Audio Clip : इंदोरीकर महाराजही आमदार लंकेंच्या पाठीशी, म्हणाले कुत्रे...

ज्योती देवरे Audio Clip : इंदोरीकर महाराजही आमदार लंकेंच्या पाठीशी, म्हणाले कुत्रे भुंकले तरी..

Subscribe

आमदार निलेश लंकेंविरोधात अनेक आरोप करण्यात येत आहे.

पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. देवरे यांनी लोकप्रतिनिधींकडून त्रास दिल्या गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुले आमदार निलेश लंके यांच्यावर जनतेचा रोष निर्माण होत आहे. आमदार निलेश लंके यांच्यावर नाराजी व्यक्त होत असताना कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी लंकेंचे कौतुक केलं आहे. इंदोरिकर महाराजांनी लंकेंना पाठींबा दिला असून त्यांच्या कामाचे कौतुक केलं आहे तसच त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर लक्ष देऊ नये असा इशारा इंदोरीकर महाराज यांनी निलेश लंकेंना दिला आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लीपमुळे खळबळ माजली आहे. राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यामध्ये आमदार निलेश लंकेंविरोधात अनेक आरोप करण्यात येत आहे. लंकेंना मोठ्या राजकीय व्यक्तींनी पाठींबा दिला असून आता कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनीही पाठिंबा दिला आहे. तसेच लंकेंना आरोपांवर दुर्लक्ष करण्याचा सल्ला इंदोरिकर महाराज यांनी दिला आहे.

- Advertisement -

कीर्तनकार इंदोरिकर महाराज यांचे निलेश लंकेंच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर म्हणजेच कोविड सेंटरमध्ये कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी कीर्तन करत असताना इंदोरिकर यांनी निलेश लंकेंना धीर दिला आहे. कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती थाटात चालत असतो असे इंदोरिकर महाराज यांनी यांनी म्हटलं आहे.

अण्णा हजारेंचा पाठिंबा

आमदार निलेश लंके यांनी होणाऱ्या आरोपांदरम्यान समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. अण्णा हजारे यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांना ज्योती देवरेंच्या कामाबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या अहवालाची प्रत दाखवली. यावर अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असे आश्वासन अण्णा हजारे यांनी दिलं आहे.

- Advertisement -

ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लीप तयार करुन आत्महत्येचा इशारा दिलाय. ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. शासकीय कामात लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे कामातील दुर्लक्ष याबाबत ज्योती देवरेंनी आपली व्यथा मांडली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यामार्फत कशाप्रकारे त्रास दिला जात आहे. मानसिक खच्चीकरण आणि धमकी देणे अशा अनेक घटनांबाबत ज्योती देवरे यांनी खुलासा केला आहे.


हेही वाचा : ज्योती देवरेंच्या समर्थनार्थ तहसीलदार संघटना मैदानात, सोमवारी राज्यव्यापी आंदोलन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -