घरमनोरंजनशिव-वीणा लग्नाआधीच घालवतायेत 'या' ठिकाणी वेळ

शिव-वीणा लग्नाआधीच घालवतायेत ‘या’ ठिकाणी वेळ

Subscribe

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरा घरात पोहचलेले शिव-वीणा आता प्रेक्षकांच्या घरातलेच एक झाले आहेत. बिग बॉसचा हा सीझन संपून दोन महिने झाले तरी या सीझनची चर्चा अद्याप संपलेली नाही. हे दोघे काय करतात,लग्न कधी करणार याविषयी वाचायला चाहत्यांना नेहमी आवडते. कारण बिग बॉसच्या या सीझनमध्ये या सीझनपेक्षा त्यांच्या अफेअरची चर्चाच जास्त रंगली.

- Advertisement -

 

त्यांच्या नात्यावर बऱ्याच जाणांनी टीका केली. बऱ्याच जाणांनी हा शो संपल्यानंतर यांच नात संपेल अशी तक्रारही केली होती. मात्र सीझन संपल्यावरही या दोघांच्या रोमान्यमध्ये जरा सुद्दा फरक पडलेला नाहीये. अजून हे दोघे रोमियो-ज्यूलीएट सारखे सगळीकडे फिरताना दिसतात.

- Advertisement -

सध्या हे दोघं काश्मिरमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. यावेळी दोघांनी काश्मिर ड्रेसमध्ये फोटो काढले आहेत. यावेळी विणाने ‘इशारो,इशारो मे दिल लेने वाले बता ये तूने हौनर सीखा कहासे’ असं कॅप्शन दिलं आहे.

बिग बॉसच्या घरात असताना या दोघांनी लग्नाची कबूली दिली होती. पण बिग बॉसच्या घरात शिवची आई आली असता त्यांनी विणा आणि शीवच्या लग्नाला विरोध केला होता. आता या दोघांच्या लग्नाची सगळे खूप वाट पहात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -