घरलाईफस्टाईलसावधान! 'या' चार सवयी तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतात

सावधान! ‘या’ चार सवयी तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतात

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या संसर्गा दरम्यान आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, हा कोरोना व्हायरस त्या लोकांपैकी संक्रमित करत आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी लोक निरोगी आहाराचा वापर करतात. अनेकदा पौष्टिक घटक खाल्ल्यानंतरही बरेच जण आजारी पडतात. दरम्यान रोजच्या दिनक्रमात अशा काही सवयी आपल्याला असतात ज्यामुळे शरीरात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत, कोरोना संक्रमण टाळण्यासाठी लोकांनी वेळीच या सवयींमध्ये बदल केले तर कोरोनापासून तुमचे संरक्षण होऊ शकते.

जास्त प्रमाणात खाणे

कधीकधी लोकांना चमचमीत पदार्थ खायला आवडतात. त्या चवमुळे लोकं जास्त प्रमाणात पदार्थाचे सेवन करतात. म्हणजेच त्यांचे पोट भरले असले तरीही अन्नाची चव चांगली असल्याने त्यांचे मन भरत नाही आणि यामुळे ते आवश्यकतेपेक्षा जास्त खातात. पण या खाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्यास तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते आणि तुम्ही आजारी पडू शकतात.

- Advertisement -

रात्री उशिरापर्यंत जागणे

जे लोक रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांची रोगप्रतिकार शक्ती हळूहळू कमी होऊ लागते. कारण रात्री झोप न आल्यामुळे झोप खराब होते आणि यामुळे संपूर्ण शरीर विचलित होते. मनाला विश्रांती न मिळाल्याने मानसिक तणाव थकवा जाणवू शकतो. शरीरात वेदना आणि थकवा जाणवल्याने व्यक्ती सर्दी आणि ताप अशा आजाराच्या कचाट्यात सापडते. त्यामुळे तुम्ही ही सवय त्वरित बदलली पाहिजे.

हात व्यवस्थित स्वच्छ न करणे

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. काही लोक बाहेरून येतात आणि आपले हात व्यवस्थित धुत नाहीत. यामुळे हातावर असलेले बॅक्टेरिया तोंडात जातात. ज्यामुळे लोक आजारांना बळी पडू शकतात. यामुळे अतिसार, अन्न विषबाधासारखे आजार होतात. अशा परिस्थितीत हात धुण्याची सवय वेळेत बदलली पाहिजे.

- Advertisement -

जास्त पाणी पिणे

काही लोक जास्त पाणी पितात. यामुळे देखील आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. आपले मूत्रपिंड जास्त पाणी पचविण्यात अक्षम असते, ज्यामुळे शरीरात असणारे सोडियम कमी होण्यास सुरवात होते आणि पेशी सुजतात आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -