नयनताराच्या लग्नात टॉलिवूडसह बॉलिवूड कलाकारसुद्धा लावणार हजेरी

नयनताराच्या लग्नात शाहरूख शिवाय रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, सूर्या, कार्ति, विजय सेतुपति आणि सामंथा रुथ प्रभु यांसारखे अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत

साउथ चित्रपट सृष्टीतील स्टार कपल अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन आज म्हणजेच 9 जून रोजी विवाहबंधनात अडकणार असून चेन्नई येथील महाबलिपुरममधील एका रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. 10 जून रोजी रिसेप्शन पार पडणार आहे. या स्टार कपलच्या विवाह सोहळ्यात टॉलिवूडसह बॉलिवूड कलाकार ही सहभागी होणार आहेत.

शाहरूख खान पासून रजनीकांतपर्यंत हे कलाकरही पोहोचले
अभिनेता शाहरूख खानही नयनताराच्या लग्नासाठी महाबलिपुरम येथे पोहोचला आहे. येत्या काळात ‘जवान’ चित्रपटामध्ये शाहरूख आणि नयनतारा एकत्र दिसणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नयनताराच्या लग्नात शाहरूख शिवाय रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, सूर्या, कार्ति, विजय सेतुपति आणि सामंथा रुथ प्रभु यांसारखे अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण


नुकत्याच काही दिवसांपूर्वी नयनतारा आणि विग्नेशने तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले.

6 वर्षापासून एकत्र आहेत नयनतारा आणि विग्नेश
चित्रपटसृष्टीशी जोडलेले असल्याने या दोघांची लव स्टोरी फार चर्चेत असते. या दोघांची पहिली भेट एका सेट वर झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेशने केले होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. मैत्री झाली आणि त्याचंच रूपांतर प्रेमात झाले. 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर नयनतारा आणि विग्नेशने 25 मार्च 2021 रोजी साखरपुडा केला.

नयनतारा पुढील काही दिवसात शाहरूख सोबत ‘जवान’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच येत्या 17 जून रोजी OTT वर नयनताराचा ‘O2’ रिलीज होणार आहे. तसेच लग्नानंतर दोघेही आपल्या ‘एके 62’ मध्ये काम करतील विग्नेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.


 हेही वाचा :‘फ्राईड नाइट प्लान’ वेब सीरिजमध्ये जुही चावला साकारणार मुख्य भूमिका