घरमनोरंजननेहरुंबाबत पायल रोहतगीचे वादग्रस्त वक्तव्य; गुन्हा दाखल

नेहरुंबाबत पायल रोहतगीचे वादग्रस्त वक्तव्य; गुन्हा दाखल

Subscribe

पायलने यावेळी स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरु यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे राजस्थान पोलिसांनी तिच्या विरोधात कलम ६६ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पायलने यावेळी स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरु यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजस्थान पोलिसांनी तिच्या विरोधात कलम ६६ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्यात पायलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरु यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे शुक्रवारी युवक काँग्रेसचे नेता चरमेश शर्मा यांनी राजस्थान पोलिसांकडे तिची तक्रार केली आणि त्यानुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – मुंबई पोलिसांनी ट्विटरवर ब्लॉक केल्यामुळे पायल रोहतगी असुरक्षित; अमित शहांना पत्र

- Advertisement -

काय म्हणाली होती रोहतगी?

पायल रोहतगी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या विविध पोस्टमधून स्वत:ची कट्टर हिंदूत्वाची छवी लोकांसमोर उभी केली आहे. याच कट्टरतेच्या भावनेतून तीने आतापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. काही दिवसांपूर्वी तिने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘मोतीलाल नेहरु यांच्या पाच पत्नी होत्या. त्यामुळे काँग्रेस तीन तलाकला विरोध करत असणार. याशिवाय मोतीलाल नेहरु हे जवाहरलाल नेहरुंचे सावत्र वडील होते.’ नेहरुंबाबत केलेल्या या वक्तव्यासाठी तिने ऐलिना रामाकृष्णा यांनी लिहलेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला. या व्हिडिओमध्ये तिने असे अनेक वादग्रस्त वक्तव्य केले होते. अखेर तिच्या विरोधात राजस्थान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -