घरताज्या घडामोडीBipin Rawat यांच्या निधनावर आनंद व्यक्त केल्याने मल्याळम दिग्दर्शकाने इस्लाम धर्माचा केला...

Bipin Rawat यांच्या निधनावर आनंद व्यक्त केल्याने मल्याळम दिग्दर्शकाने इस्लाम धर्माचा केला त्याग

Subscribe

तामिळनाडू कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांना मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. एकाबाजूला सर्व लोकं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आदरांजली आणि दुःख व्यक्त करत आहे, तर दुसऱ्या बाजूला कट्टर इस्लामी लोकं देशाच्या रिअल हिरोवर निशाणा साधत आहेत. ज्यामुळे आता मल्याळम लोकप्रिय दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला आहे. फेसबुक लाईव्हद्वारे इस्लाम धर्माचा त्याग करणार असल्याचे अली अकबर यांनी सांगितले आहे.

नक्की काय घडले?

काही दिवसांपूर्वी अली अकबर यांनी बिपीन रावत यांच्या निधनावर लाईव्ह व्हिडिओ केला होता. ज्यावर काही इस्लामी कट्टरपंथी लोकांनी हसण्याचे इमोजी टाकले होते. यादरम्यान सीडीएस जनरल रावत यांची खिल्ली उडवण्याचा देखील प्रयत्न केला होता. लोकांच्या याच आक्षेपार्ह वर्तणुकीमुळे दिग्दर्शक अली अकबर यांनी हे मोठे पाऊल उचलले आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे इस्लाम धर्माचा त्याग करणार असल्याचे जाहीर केले. बिपीन रावत यांना श्रद्धांजली देताना अली अकबर म्हणाले की, हे मी कधी स्वीकार करू शकत नाही आणि त्यामुळे मी माझा धर्म सोडत आहे. माझा आणि माझ्या कुटुंबियांचा कोणताही धर्म नाही.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, इस्लामचे श्रेष्ठ धर्मगुरुंनी आणि नेत्यांनीही देशद्रोहींच्या अशा प्रकारच्या वर्तणुकीचा विरोध केला नाही. ज्यांनी एका शूरवीर सैनिक अधिकाऱ्याचा अपमान केला आहे, हे ते स्वीकार करू शकत नाहीत. त्यांचा धर्मावरून विश्वास उठला आहे. आज मी जन्मापासून घातलेल्या एक कपडा फेकत आहे. आजपासून मी इस्लाम नाही. मी फक्त भारतीय नागरिक आहे.

दरम्यान अली अकबर बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर फेसबुकवर लाईव्ह आले होते. परंतु फेसबुकने त्यांचे अकाऊंट सस्पेंड केली. पण त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यामुळे अली अकबर यांनी आपले नवे अकाउंट तयार केले आणि सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर आनंद व्यक्त करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

हेही वाचा – Tamil Nadu Helicopter Crash: ४ जवानांची ओळख पटली; आज कुटुंबियांकडे पार्थिव सोपवणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -