घरमहाराष्ट्रनाशिकचाळीसगाव-धुळे दरम्यान मेमू लोकल धावणार

चाळीसगाव-धुळे दरम्यान मेमू लोकल धावणार

Subscribe

भुसावळ विभाग : सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत चौथी मेमू लोकल गाडी

नाशिकरोड: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात पॅसेंजरऐवजी सोमवारपासून (दि.१३) मेमू लोकल गाडी सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली. यापुर्वी भुसावळ विभागात दोन मेमू गाड्या सुरु झालेल्या आहेत, सोमवारी तिसरी मेमू सुरु होत आहे. मेमू गाडीत सोयी सुविधा अधिक असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव-धुळे पॅसेंजर बंद होती, २०१९ च्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भुसावळ येथे मध्य रेल्वेच्या तांत्रिक विभागातील ६० अधिकारी व कर्मचारी यांना मेमूचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर भुसावळ विभागात यापूर्वी भुसावळ अमरावती, भुसावळ इटारसी, भुसावळ- बडनेरा, या तीन मेमू गाड्या सुरु आहेत. त्याचप्रमाणे नागपूरमार्गे येणारी भुसावळ नरखेर (अमला लाईन) वर धावत आहेत. सोमवारी (दि.१३) चाळीसगाव-धुळे दरम्यान चौथी मेमू सुरु होणार आहे.

- Advertisement -

या मेमूला आठ डब्यांचा रॅक असून कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवाशांच्या सेवेसाठी रविवार वगळता रोज फे-या होणार आहेच. मेमू गाडी या मार्गावरील चाळीसगाव, बोरस बुद्रुक, जामधा, राजमाने, मोरदड तांडा, शिरुड, बोरविहीर, लळींग, धुळे या स्थानकांवर थांबणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -