घरताज्या घडामोडीTamil Nadu Helicopter Crash: ४ जवानांची ओळख पटली; आज कुटुंबियांकडे पार्थिव सोपवणार

Tamil Nadu Helicopter Crash: ४ जवानांची ओळख पटली; आज कुटुंबियांकडे पार्थिव सोपवणार

Subscribe

तामिळनाडू कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भारतीय हवाई दलातील ४ जवानांची ओळख पटली आहे. तर उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ८ डिसेंबरला झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सीडीएस संरक्षण सल्लागार बिग्रेडियर एलएस लिद्दर यांचा देखील समावेश होता. बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह लिद्दर यांना काल, शुक्रवारी लष्करी इतमामात शेवटचा निरोप दिला. दिल्लीच्या बरार स्क्वायर स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

एका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यूमुखी झालेल्या चार जवानांची ओळख पटली आहे. यांचे पार्थिव लवकरच हवाई मार्गाने त्यांच्यासंबंधित कुटुंबियांकडे सुपूर्द केले जाईल. या चारमध्ये जेडब्ल्यूओ प्रदीप ए, विंग कमांडर पी.एस. चौहान, जेडब्ल्यूओ राणा प्रताप दास आणि स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह यांचा समावेश आहे.

- Advertisement -

तसेच माहितीनुसार, लान्स नायक बी साई तेजा आणि लान्स नायक विवेक कुमार यांच्या पार्थिव शरीराची देखील ओळख पटली आहे. याबाबत आज सकाळी त्यांच्या कुटुंबियांना सैनिकांनी माहिती दिली. त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांचे पार्थिव दिले जाणार आहे.

- Advertisement -

तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले भारताचे सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात काल अंत्यसंस्कार करण्यात आले. कृतिका आणि तारिणी या त्यांच्या मुलींनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी जनरल रावत यांच्या नातेवाईकांनीही अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. त्यांना १७ ‘गन फायर’ची सलामी देण्यात आली. यावेळी देशातील दिग्गज राजकीय नेत्यांसह भारतीय संरक्षण दलातील ८०० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सैन्य दल प्रमुखांनी उपस्थिती लावली.


हेही वाचा – CSD Bipin Rawat Helicopter Crash: हेलिकॉप्टरच्या ९५ टक्के दुर्घटनांना जबाबदार IMC! बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचे हेच कारण?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -