घरमनोरंजनकॉमेडियन भारतीला मिळाला डिस्चार्ज, बाळाला घरी नेताना झाली भावुक

कॉमेडियन भारतीला मिळाला डिस्चार्ज, बाळाला घरी नेताना झाली भावुक

Subscribe

मुंबईच्या ब्रीच कॅंन्डी हॉस्पिटलमधून निघताना भारती आणि हर्षला स्पॉट करण्यात आलं. यासंबंधीत एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे.

कॉमेडियन भारती सिंहने ३ एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर तिच्या कुटुंबासह टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आनंदाचं आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर भारती आणि हर्षचं अभिनंदन करत आहेत. भारती सिंह तिच्या सोशल मीडियावर हॉस्पिटलमधून अनेक फोटो शेअर करत आहे. तिचे चाहते तिच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच आता भारती सिंहला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे.

भारतीला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

भारती तिचा पती हर्ष सोबत त्यांच्या घरी परतली आहे. मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमधून निघताना भारती आणि हर्षला स्पॉट करण्यात आलं. या संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये हर्ष त्यांच्या मुलाला हातात घेऊन जाताना दिसत आहे. मात्र, यामध्ये त्यांच्या मुलाचा चेहरा दिसत नाही. शिवाय भारतीने यावेळी मीडियासमोर आनंदाने पोज दिली.

- Advertisement -

भारतीच्या मुलासाठी सोशल मीडियावर चाहते नाव सुचवत आहेत
भारती सिंहच्या मुलाच्या जन्माने तिचे चाहते खूप आनंदी आहेत, सोशल मीडियावर अनेक जण तिला शुभेच्छा देत आहेत, इतकंच नाही तर भारती आणि हर्षचे चाहते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर मुलाच्या नावाचं सजेशन देत आहेत.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याआधी शेअर केले होते हा फोटो


भारती सिंहने तिच्या डिलिव्हरीनंतर हॉस्पिटलमधून एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ज्यात सेल्फी शेअर करत भारती म्हणतेय की, मुलाचा जन्म झाल्यापासून तिचं आयुष्य बदलून गेलं आहे. भारती सिंहने कॅप्शनमध्ये लिहिलं की, आता झोपायचे नाही जागायचे आहे फक्त… तिच्या या कॅप्शनवरून सहज लक्षात येतय की, ती रात्रभर जागून तिच्या छोट्या राजकुमाराची काळजी घेत आहे.

हेही वाचा :बाळ झाल्यावर भारती सिंहची उडाली झोप, शेअर केला फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -