घरमनोरंजनग्राहकाच्या तक्रारीवरून बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना कोर्टाने ठोठावला दंड!

ग्राहकाच्या तक्रारीवरून बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना कोर्टाने ठोठावला दंड!

Subscribe

एका वेदनानाशक तेळाची खोटी जाहिरात केल्यामुळे उत्तर प्रदेशातील ग्राहक न्यायालयाने गोविंदा आणि जॅकी श्रॉफवर दंड लावला.

टि.व्हीवर आपण जाहिराती तर नेहमीच पाहतो पण जाहिरातीत जर एखादा अभिनेता असला तर ती जाहिरात आणि त्यातील उत्पादन आपल्याला अधीक आकर्षक वाटतात. तर अशीच एका वेदनानाशक तेलाची जाहिरात अभिनेता गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांनी केली होती. तर ती जाहिरात खोटी आहे आणि त्यातील उत्पादन जाहिरातीत सांगीतल्याप्रमाणे परिणाम देत नाही म्हणून उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगर ग्राहक कोर्टाने गोविंदा आणि जॅकी श्रॉफवर २० हजार रुपयांचा दंड लावला आहे. आणि जी कंपनी या तेलाचं उत्पादन करते त्या कंपनीवर देखील दंड ठोठावला आहे.

खोटी जाहिरात केल्यामुळे गोविंदा आणि जॅकी श्रॉफवर उत्तर प्रदेश न्यायालयानं ठोठावला दंड
खोटी जाहिरात केल्यामुळे गोविंदा आणि जॅकी श्रॉफवर उत्तर प्रदेश न्यायालयानं ठोठावला दंड
का ठोठावला दंड? 

५ वर्षांपूर्वी अभिनव अग्रवाल नावाच्या तरुणाने केलेल्या तक्रारीनंतर कोर्टानं ही सुनावणी दिली. जुलै २०१२ मध्ये अभिनव अग्रवालनं वृत्तपत्रात या तेलाची जाहिरात पाहून आपल्या वडिलांसाठी हे तेल मागवलं. तेल वापरण्याच्या १५ दिवसात जर पाहिजे तसा परिणाम नाही मिळाला तर पूर्ण पैसे परत केले जातील असा दावा जाहिरातीत दिल्यामुळे अग्रवालनं हे तेल मागवलं. १० दिवसात तेलाचा काहीच परिणाम न झाल्यामुळे अग्रवालनं कंपनीशी संपर्क केला आणि पैसे परत मिळवण्यासाठी तेल परत करायला सांगितलं. मात्र त्यानंतरही कंपनीनं अग्रवालचे पैसे काही परत केले नाही आणि त् जेव्हा अग्रवालनं पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कंपनी त्याला त्रास देऊ लागली. मुळात गोविंदा आणि जॅकी श्रोफ या तेलाची जाहिरात करत असल्यामुळे अग्रवालनं ते तेल मागवलं होतं.

- Advertisement -

तर अखेर आता उत्तर प्रदेशातील ग्राहक कोर्टानं कंपनी, गोविंदा, जॅकी श्रॉफ आणि कंपनीतल्या बाकी भागधारकांना मिळून अग्रवालला २० हजारा रुरयाची भरपाई देण्यास सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -