घरमनोरंजनदिग्दर्शक मृणाल सेन कालवश,९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिग्दर्शक मृणाल सेन कालवश,९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला सिनेमा 'मृगया' या सिनेमाचे दिग्दर्शन केले. मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय आणि१२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मानाच्या पद्म भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. ते ९५ वर्षांचे होते. कोलकात्यातील भवानीपोरे येथील त्याच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीत सेन यांचे मोठे योगदान असून त्यांनी बंगाली सिनेमात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली आहे. २००५ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कोण आहेत मृणाल सेन?

मृणाल सेन यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी फरिदापूर येथे झाला. फरिदापूर हे संध्या बांग्लादेमध्ये आहे. फरिदापूरलाच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोलकत्त्याला गेले. तिथे स्कॉटीश चर्च कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी कल्चरल विंगमध्ये काम केले. सिनेमांची आवड त्यांना होती. १९५५ साली ‘रात भोर’ नावाचा सिनेमा तयार केला. त्यानंतर त्यांनी नीले आकाशेर नीचे (under the blue sky) हा सिनेमा तयार केला. या सिनेमाने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांचा तिसरा सिनेमा ‘बईशे श्रावण’ (the day when ravindranath tagore died) या सिनेमाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.

- Advertisement -

- Advertisement -

पुरस्कारांनी केले सन्मानित

मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला सिनेमा ‘मृगया’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले. मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय आणि१२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मानाच्या पद्म भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. २००२ सालापर्यंत मृणाल चित्रपटांचे दिग्दर्शन करत होते. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी ‘आमार भुवन’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले. २००५ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.

सिनेमा आणि लघुपटाचेही दिग्दर्शन

रात भोरे (१९५५), नीले आकाशेर निचे (१९५९), बाईशे श्रावणा (१९६०), पुनश्च (१९६१), आभाशेशे (१९६३), प्रतिनिधी (१९६४), आकाश कुसूम (१९६५), मतिरा मनिषा (१९६६), भुवन शोमे(१९६९), इंटरव्ह्यू (१९७१), एक अधुरी कहानी (१९७१), कोलकाता ७२ (१९७२), पदतिक (१९७३), चोरस (१९७४), म्रिगया (१९७६), ओका ओरी कथा (१९७२), परासुरम (१९७८), एक दिन प्रतिदिन (१९७९) असे काही त्यांचे प्रसिद्ध सिनेमे आहेत. या शिवाय त्यांनी अनेक लघुपटांचे आणि डॉक्युमेंटरीजचे दिग्दर्शनही मृणाल सेने यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -