घरमनोरंजनदीपिका कक्कर ठरली 'बिग बॉस १२' ची विजेती

दीपिका कक्कर ठरली ‘बिग बॉस १२’ ची विजेती

Subscribe

दीपिका कक्कर ही 'बिग बॉस सिझन १२' ची विजेती ठरली आहे. तर माजी क्रिकेटपटू श्रीशांत हा या सिझनचा उपविजेता ठरला आहे.

हिंदी ‘बिग बॉस सिझन १२’ चा विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर प्रेक्षकांचा या उत्सूकतेनंतर दीपिका कक्कर ही ‘बिग बॉस सिझन १२’ ची विजेती ठरली आहे. तर माजी क्रिकेटपटू श्रीशांत हा या सिझनचा उपविजेता ठरला आहे. विजेती झालेली दीपिका याअगोदर ‘ससुराल सीमर का’ या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. तिने एकेकाळी एअर होस्टेसची नोकरी केली आहे. आता बिग बॉस सिझन १२ ची विजयी ठरल्यानंतर ती चांगल्याच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. विजेती ठरल्यानंतर ही दीपिका नक्की कोण आहे, असा प्रश्न काही लोकांना पडत आहे. तिच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये सध्या चांगलीच उत्सुकता दाटून आली आहे. या दीपिकाचा नेमका प्रवास कसा होता, असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे.

असा आहे दीपिकाचा प्रवास?

दीपिका कक्करचा जन्म ६ ऑगस्ट १९८६ रोजी पुणे येथे झाला. तिने मुंबई येथे शिक्षण घेतले. तिने तीन वर्ष एअर होस्टेसची नोकरी केली. त्यानंतर तिने नोकरी सोडली. यानंतर तिने अभिनयात पदार्णण केले. तिने ‘झलक दिखला जा’ या शोच्या ८ व्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. २०१० मध्ये तिने ‘नीर भरे तेरे नैना देवी’ यातून टेलिव्हिजन मालिकांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती जेपी दत्ता यांच्या ‘पलटन’ चित्रपटातही काम केले. ‘ससुराल सीमर का’ या मिलेकेदरम्यान ती चांगली प्रसिद्धी झोतात आली. या मालिकेदरम्यान तिचे शोएब इब्राहिमसोबत प्रेमसंबंध जुळले. तिने शोएबसोबत स्क्रिन शेअर केली होती. दोन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर फेब्रुवारीमध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला.

- Advertisement -

हेही वाचा – जेव्हा डायन ‘आँख मारे’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -