घरमहाराष्ट्रचंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला हायकोर्टाचा नकार

चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला हायकोर्टाचा नकार

Subscribe

पुण्यातील दोन्ही सभांना परवानगी नाकारल्यामुळे चंद्रशेखर यांनी कोर्टाकडे दाद मागितली तर कोर्टाने या सुनावणी दरम्यान चंद्रशेखर यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही ४ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात आहे.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. आज त्यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला कोर्टाने परवानगी नाकारली आहे. या सभेच्या माध्यमातून ते आंबेडकरी तरुणाईंशी संवाद साधणार होते. याआधी ३० डिसेंबरला शिवाजीनगर एसएसपीएमएस मैदानावरील चंद्रशेखर यांची सभा नाकारण्यात आली होती. हायकोर्ट आणि पुणे पोलिसांनी या सभेची परवानगी नाकारली होती. दोन्ही सभांना परवानगी नाकारल्यामुळे चंद्रशेखर यांनी कोर्टाकडे दाद मागितली तर कोर्टाने या सुनावणी दरम्यान चंद्रशेखर यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही ४ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद पुण्याकडे रवाना


भीमा-कोरेगावला जाणारचं

पुण्यातील शिवाजीनगर एसएसपीएमएस मैदानावर चंद्रशेखर आझाद यांच्या सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. व्यासपीठ उभारण्यात आले होते. मात्र त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्यामुळे व्यासपीठ आणि मंडप काढण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, या मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर प्रशासनानं कितीही जोर लावला तरीही आम्ही कोरेगाव-भीमाला जाणारच असल्याचा इशारा चंद्रशेखर यांनी दिला आहे. परवानगी मिळाली नाही तर कार्यकर्त्यांसह पायी चालत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे सरकार आंबेडकरी जनता आणि कार्यकर्त्यांचा आवाज दाबत असून आम्हाला नजरकैदेत ठेवले जात आहे, असा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मी सभेला जाणारच – चंद्रशेखर आझाद


पुण्याच्या दोन्ही सभा रद्द

याआधी मुंबईत सभेसाठी आलेल्या भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांना मुंबई पोलिसांनिी नजरकैदमध्ये ठेवले होते. त्यांची शनिवारी वरळीच्या जांबोरी मैदानात सभा होती. मात्र या सभेपूर्वीच त्यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदत ठेवले. मालाड येथील मनाली हॉटेलमध्ये त्यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यानंतर तणावाचे वातावरण पाहता मुंबई पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. चंद्रशेखर आझाद यांची मुंबई पोलिसांच्या नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यानंतर ते पुण्याकडे रवाना झाले होते. मात्र पुण्यात आल्यानंतरही त्यांना सभा घेण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे चंद्रशेखर यांच्या पुण्यातील दोन्ही सभा रद्द झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -