घरताज्या घडामोडीदीपिकाचा इन्स्टाग्रामवर कम बॅक, पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

दीपिकाचा इन्स्टाग्रामवर कम बॅक, पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिने सोशल मीडियाला काही काळासाठी राम राम केला होता. दीपिका गेली अनेक दिवस तिच्या सोशल मीडिया हॅडलवर अँक्टिव्ह नव्हती. ऐरवी देखील दीपिका सोशल मीडियावर फारशी अँक्टिव्ह नसते. मात्र मागच्या ६९ दिवसांनी दीपिकाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पाहताच दीपिकाच्या फॅन्सनी फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. तब्बल ६९ दिवसांनी दीपिकाची पोस्ट पाहून तिचे फॅन्स भलतेच खुश झालेत. दीपिकाने एक्सपेक्टेशन वर्सेस रियलिटी असे म्हणत एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाने दोन फोटो शेअर केलेत. ज्यात एका फोटोत दीपिका योगा करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत रियलिटी दाखवत दीपिका सोफ्यावर झोपलेली दिसत आहे. दीपिकाच्या या पोस्ट नंतर अनेक रिअँक्शन दिली आहे. एवढच नाही तर दीपिकाच्या सोशल मीडियावरील कम बॅकवर तिचे फॅन्स खूप खुश झाल्याचे दिसत आहे. (Deepika Padukon back on Instagram, share expectation vs reality funny photo)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

- Advertisement -

शेवटी ६९ दिवसानंतर दीपिकाची पोस्ट आली,असे म्हणत अनेक हार्ट वाले इमोजी कमेंटमध्ये पोस्ट करण्यात आलेत. तर ‘आम्हाला तुझी खूप आठवण आली सनशाईन’,असे म्हणत दीपिकासाठी प्रेम व्यक्त केलेय. दीपिकाच्या रियलिटी फोटोवर एका फॅनने लिहिले, ‘कोणी झोपवल्यावर देखील इतकं सुंदर कसे दिसू शकतात’  दीपिकाच्या पोस्टवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)


अभिनेत्री दीपिका लवकरच ८३ या सिनेमात अभिनेता रणवीर सिंग सोबत दिसणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारित आहे. दीपिका या सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. वे द इंटर्न, फाइटर,पठाण त्याचप्रमाणे सुपरस्टार प्रभास आणि निर्माते दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्यासोबत काम करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कार्तिक-साराचं प्रेम पुन्हा बहरणार, रोमँटीक सिनेमात कार्तिक-साराची वर्णी?

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -