घरमनोरंजनकार्तिक-साराचं प्रेम पुन्हा बहरणार,रोमँटीक सिनेमात कार्तिक-साराची वर्णी?

कार्तिक-साराचं प्रेम पुन्हा बहरणार,रोमँटीक सिनेमात कार्तिक-साराची वर्णी?

Subscribe

निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी नुकतच नम: पिक्चर्स अंतर्गत कार्तिक सोबत 'सत्यनारायण की कथा' या सिनेमाची घोषणा केली आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(kartik Aryan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) या जोडीला दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांच्या ‘लव आज कल'(Love Aaj Kal) या सिनेमातून प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले दोघांची जोडी चांगलीच चर्चेत आली होती. हा सिनेमा चाहत्यांच्या काही खास पसंतीस उतरला नाही पण सारा आणि कर्तिकने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. दोघांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनूसार कार्तिक आणि सारा पुन्हा एकत्र काम करतांना दिसणार आहे.तसेच हा सिनेमा साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiyadwala) प्रोड्युस करणार असल्याचे कळतेय. प्रोडक्शन हाउसच्या जवळील सुत्रांतर्फे असे सांगण्यात येत आहे की एक नवा रोमॅंटीक सिनेमा तयार करण्यात येणार आहे तसेच यामध्ये तरुण युवा अभिनेत्यांची वर्णी लागणार आहे. प्रोडक्शन हाउस सारा अली खानला प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करणार असल्याचा विचार करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी नुकतच नम: पिक्चर्स अंतर्गत कार्तिक सोबत ‘सत्यनारायण की कथा’ या सिनेमाची घोषणा केली आहे. आणि याचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार आहेत. रोहित धवनच्या सिनेमाचे शुटींग पुर्ण झाल्यानंतर कार्तिक या सिनेमात काम करणार आहे.कार्तिक आणि सारा या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. कर्तिकतच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास कार्तिकचा आगामी सिनेमा धमाका,भूल भुलैया 2, मध्ये झळकणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा  – कतरिनाच्या घराबाहेर विकी कॅमेऱ्यात झाला कैद


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -