घरमनोरंजनVideo: इरफानच्या आठवणीने दीपिका भावूक; म्हणाली, 'प्लीज परत ये'!

Video: इरफानच्या आठवणीने दीपिका भावूक; म्हणाली, ‘प्लीज परत ये’!

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने दिवंगत कलाकार इरफान खान यांची आठवण काढत परत येण्याची विनंती केली आहे. दीपिका आणि इरफान यांनी पीकू चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळे दीपिका आपल्या सहकाराच्या निधनाने खुपच व्यथित झाल्याचे समजते. दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर पीकू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान फावल्या वेळेत दोघेही टेनिस खेळत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच तिने प्लीज, परत ये, असेही म्हटले आहे. दीपिकाची ही भावूक पोस्ट शेअर करत इरफानची आठवण काढली आहे.

View this post on Instagram

please come back!? #irrfankhan

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

पाच वर्षांपूर्वी आलेल्या पीकू चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यावेळी शूटिंग दरम्यान, दीपिका आणि इरफान टेनिस खेळत असल्याचा व्हिडिओ दीपिकाने शेअर केला आहे. यामध्ये इरफान दीपिकाला सहज बॉल टोलावताना दिसत असून दीपिका लक्षकेंद्रीत करून तो परतवत आहे. इरफान खान हे उत्तम क्रिकेटर असल्याचे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अंदाज घेऊन बॉल मारणे नक्कीच त्यांना चांगल्याप्रकारे माहिती होते. हेही यातून दिसून येते.

दिवंगत कलाकार इरफान खान यांचे काही दिवसांपूर्वी कर्करोगाच्या आजाराने मुंबईत निधन झाले. गेल्या दीड वर्षापासून ते कर्करोगाशी लढा देत होते. अखेर त्यांची झुंज संपली. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. लॉकडाऊनमुळे सहकलाकारांना त्यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

खुशखबर! गावी जाणाऱ्यांसाठी मोफत एसटी सेवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -