घरमनोरंजन'या' आजारामुळे दिलीप कुमार, पुन्हा रुग्णालयात

‘या’ आजारामुळे दिलीप कुमार, पुन्हा रुग्णालयात

Subscribe

दिलीप कुमार यांना रविवारी रात्री रूग्णालयात दाखल करण्यात अालं असून, त्यांना पुन्हा एकदा निमोनिया झाल्याचं निदान झालं आहे.

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना निमोनिया झाला असून, त्यांना पुन्हा एकदा लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमारांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती त्यांचे निकटवर्ती फैजल फारुकी यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. ‘दिलीप कुमार यांना रविवारी रात्री रूग्णालयात दाखल करण्यात अालं असून, त्यांना पुन्हा एकदा निमोनिया झाल्याचं निदान झालं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. तुम्हाला मी ट्विटरवरुन माहिती देत राहीन’, असं फैजल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. नेहमीप्रमाणे दिलीप कुमार यांच्याच अकाउंटवरुन त्यांनी हे ट्वीट केले आहे. गेल्या महिन्यातही दिलीप कुमार यांना लिलावती रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांनी श्वास घ्यायला त्रास होत होता, याच कारणामुळे त्यांना मागील महिन्यात रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे काहीसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या काही काळापासून दीलिप कुमार यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळतो आहे. ९५ वर्ष वय असलेल्या दीलिप कुमारांची प्रकृती वारंवार अस्थिर होत असल्यामुळे, त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये तसंच त्यांच्या चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिलीप कुमारांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्यांनी बरीच वर्ष चित्रपटसृष्टीची सेवा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -