घरताज्या घडामोडीDisha Patani : दिशानं उचललं ८० किलो वजन, सासू अन् नणंदेनं...

Disha Patani : दिशानं उचललं ८० किलो वजन, सासू अन् नणंदेनं केलं कौतुक

Subscribe

व्हिडीओमध्ये दिशा पटनी ८० किलो वजन उचलताना आणि ५ रॅक ओढताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसह बॅालीवूड मधील अनेक कलाकारांनी कमेंटद्वारे भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॅालीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटनी नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. सोशल मिडियावर तिचे अनेक चाहते आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर आणि फिटनेस व्हिडीओवर चाहते कमेंटद्वारे भरभरून प्रेम व्यक्त करत असतात.  सध्या तिचा असाच एक नवीन व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होत आहे. ज्यात ती  ८० किलो वजन उचलताना आणि ५ रॅक ओढताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसह बॅालीवूड मधील अनेक कलाकारांनी कमेंटद्वारे भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टाइगर श्रॅाफच्या आईने दिशाच्या व्हिडीओला कमेंट केली आहे. टायगरच्या आईने दिशाला कमेंटमध्ये ‘प्राणी’ म्हटले आहे.  इतकंच नव्हे तर टाइगर श्रॅाफची बहीण कृष्णाने ‘तुम फायर’ हो असे म्हणत दिशाचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

दिशाने सध्या सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ‘योद्धा’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये दिशा आणि सिद्धार्थ प्रमुख भूमिकेत असून अभिनेत्री राशी खन्ना सुद्धा  मुख्य भूमिका साकारणार आहे.  योद्धा हा आगामी चित्रपट करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शन आणि शशांक खेतान नवनिर्मित फिल्म्स द्वारे प्रसारित होणार आहे.

- Advertisement -

दिशाचा ‘एक विलेन’ २ हा नवा चित्रपटसुद्धा यावर्षी प्रसारित होणार आहे. हा चित्रपट २०१४ च्या एक विलेनचा दुसरा सिक्वेल आहे. या चित्रपटाचं एकता कपूर आणि भूषण कुमार एकत्र मिळून  प्रोडक्शन करणार आहेत. या चित्रपटात जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर प्रमुख भूमिका साकारताना दिसून येणार आहेत.

२०२१ मध्ये दिशाने सलमान खानसोबत ‘राधे’ या चित्रपटात काम केलं होतं, त्याआधी २०२० मध्ये ती ‘बागी ३’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात दिशा बरोबर टाइगर श्रॅाफ प्रमुख भूमिकेत दिसून आला होता.


हेही वाचा – Mumbai : दारुच्या नशेत पोलिसांना मारहाण, दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -