घरमनोरंजनPoonam and Dolly :प्रसिद्ध अभिनेत्री देतेय सर्व्हायकल कॅन्सरशी झुंज, पूनमच्या स्टंटवर भडकली!

Poonam and Dolly :प्रसिद्ध अभिनेत्री देतेय सर्व्हायकल कॅन्सरशी झुंज, पूनमच्या स्टंटवर भडकली!

Subscribe

अभिनेत्री पूनम पांडे हीचे निधन झाल्याची पोस्ट व्हायरल होताच सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पूनम पांडे हिचे 32 व्या वर्षी सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाले अशी माहिती इंन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या टीमकडून शेअर करण्यात आली होती.
24 तासानंतर पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली. स्वत: पूनमने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जागरुकता पसरवण्यासाठी निधनाची बातमी दिली असं पूनमने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

पूनम पांडेंने स्वत: च्या बातमीचा स्टंट केल्याने सर्वजण तिच्यावर भडकले आहेत. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी तिने हे केलं. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीही तिला खडेबोल सुनवत आहे. तर सोशल मीडियावरही नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. इतकच नाही तर तिच्यावर कारवाई व्हावी अशीही मागणी केली जात आहे.
खरोखरच सर्व्हायकल कॅन्सर असलेल्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पूनमने भावना दुखावल्या अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जी स्वत: सर्व्हायकल कॅन्सरशी झुंज देत आहे तिनेही पूनम पांडेच्या या मृत्यूच्या स्टंटवर प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

पूनम पांडेच्या स्टंटवर डॅाली सोही भडकली
लोकप्रिय हिंदी मालिका ‘झनक’ मध्ये सृष्टी मुखर्जी ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री “डॅाली सोही”( Dolly sohi). डॅालीला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्व्हायकल कॅन्सरचे निदान झाले.
पूनम पांडेच्या स्टंटवर डॅाली एका मुलाखतीत म्हणाली, ” पूनमने स्वत:च्या मृत्यूची अफवा पसरवली, ज्या महिला आधीच या गंभीर आजाराचा सामना करत आहेत त्या मोठ्या वेदनेतून जात आहेत. पूनम तुला खरच लाज वाटली पाहिजे तू . मी सध्या खूप भावूक आहे. कॅन्सरबद्दल जनजागृती करा, पण असे स्टंट किंवा खोट्या मोहिमा करु नका.”
“खर सांगायचं तर जेव्हा मी ही बातमी वाचली तेव्ही मी खूप घाबरली. जी मुलगी चांगली आहे तिचा अचानक मृत्यू कसा होऊ शकतो. मला अशा लोकांना एक संदेश द्यायचा आहे. हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. अशा प्रकारे कॅन्सर होऊ नये अशी जनजागृती करा.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -