घरठाणेShambhuraj Desai : महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक; शंभूराज देसाईंनी दिली माहिती

Shambhuraj Desai : महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक; शंभूराज देसाईंनी दिली माहिती

Subscribe

कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

ठाणे : शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज रविवारी (4 फेब्रुवारी) मंत्री शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना बोलताना दिली. (Shambhuraj Desai Mahesh Gaikwads condition is critical Information given by Shambhuraj Desai)

कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणातील मुख्य आरोपी आमदार गणपत गायकवाड सध्या पोलीस कोठडीत आहेत. याचदरम्यान आमदार गणपत गायकवाड यांच्यावर आता Atrocityअंतर्गत गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे येत असतानाच शिंदे गटातील मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज रुग्णालय गाठत महेश गायकवाड यांची भेट घेतली.

- Advertisement -

काय म्हणाले मंत्री शंभूराज देसाई?

महेश गायकवाड यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महेश गायकवाड यांच्यार शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून, डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आलं आहे. डॉक्टकरांनी सांगितले की, शस्त्रक्रिया जरी पूर्ण झाली असली तर काळजी करण्याचं कारण आहे. डॉक्टकरांचे प्रयत्न सुरू आहेत. मी डॉक्टारांच्या सल्ल्याने महेश गायकवाड यांना फक्त पाहिलं. त्यांच्याशी माझं बोलण झालं नाही. डॉक्टारांशी चर्चा केली. अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

हेही वाचा : Pandharpur Marathon : खासदारांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले अन् स्वतः 21 किलोमीटर धावले

- Advertisement -

सरकारमधील कोणत्याच व्यक्ती हस्तक्षेप करत नाही

पुढे बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, याप्रकरणात पोलीस त्यांचे काम करतील. पोलीस किंवा कायद्याच्या कामात सरकार अथवा त्यातील कोणताही मंत्री कसलाही हस्तक्षेप करत नाही असेसुद्धा मंत्री शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Deep Cleaning Drive : स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे आवाहन

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हा महिनाभरापासून सुरू असलेल्या जमिनीच्या प्रकरणात तक्रार देण्यासाठी शुक्रवारी आपल्या कार्यकर्त्यांसह उल्हासनगरमधील हिल लाइन पोलीस ठाण्यात आला होता. त्याचवेळी महेश, पाटील व चैनू जाधव हे देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर गणपत गायकवाड हे देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले. यावेळी हिल लाइन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाच्या दालनात गणपत गायकवाड यांनी रात्री उशीरा महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. सध्या हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार गाजत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -