घरताज्या घडामोडीभोपालीसंदर्भातील वादग्रस्त विधान Vivek Agnihotriना भोवणार; मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भोपालीसंदर्भातील वादग्रस्त विधान Vivek Agnihotriना भोवणार; मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Subscribe

‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी भोपालीबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य चांगलंच भोवणार आहे. भोपालींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विवेक अग्निहोत्रींविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. २५ लाख भोपाळच्या नागरिकांचा अपमान झाला असून विवेक अग्निहोत्रींनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती.

विवेक अग्निहोत्री भोपालीविषयी काय म्हणाले होते?

एका कार्यक्रमामध्ये विवेक अग्निहोत्री भोपालीसंदर्भात बोलताना म्हणाले होते की, ‘मी भोपाळमध्ये मोठा झालो आहे. पण मी भोपाली नाही. कारण भोपालींचे एक वेगळे connotation (अर्थ) आहे. मी तुम्हाला हे एकट्यात समजवले. किंवा कोणत्याही भोपालीला विचार. भोपलीचा अर्थ होमोसेक्सुअल म्हणजे समलैंगिक असतो. नवाबी शौकवाला असा असतो.’ याच आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. वकील अली काशिफ खान देशमुख्यांद्वारे रोहित पांडे नावाच्या व्यक्तीने विवेक अग्निहोत्रींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

विवेक अग्निहोत्रींच्या या भोपाली वक्तव्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आक्षेप नोंदवला होता. दिग्विजय सिंह ट्विट करून म्हणाले होते की, ‘विवेक अग्निहोत्री हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. सर्वसामान्य भोपाळमधील रहिवाशांचा नाही. मीसुद्धा भोपाळ आणि भोपालींच्या संपर्कात आहे. परंतु मला असा कधीही अनुभव आला नाही. तुम्ही कुठेही राहा, ‘संगतीचा परिणाम होतोच.’

- Advertisement -

हेही वाचा – Arvind Kejriwal यांनी केलेल्या या टिप्पणीमुळे भडकले Vivek Agnihotri अन् दिलं ‘हे’ उत्तर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -